VIDEO | ‘दशावतारा’चा प्रयोग सुरु असतानाच हार्ट अटॅक, कलाकार व्यासपीठावरच कोसळला

हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या त्या कलाकाराला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या तो कलाकार खासगी रुग्णालयात दाखल असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे

VIDEO | 'दशावतारा'चा प्रयोग सुरु असतानाच हार्ट अटॅक, कलाकार व्यासपीठावरच कोसळला
महेश सावंत

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 12, 2022 | 12:59 PM

सिंधुदुर्ग : दशावतार नाट्यप्रयोग (Dashavatara) सुरु असतानाच कलाकाराला हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकार स्टेजवरच कोसळला. सिंधुदुर्गात आयोजित दशावतार महोत्सवात ही घटना घडली. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सिंधुदुर्गातील रेडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती. हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या कलाकाराला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. सध्या या कलाकाराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नाट्यप्रयोग सुरु असतानाच कलाकार कोसळत असतानाचा व्हिडीओ टीव्ही9 मराठीच्या हाती लागला आहे.

नेमकं काय घडलं?

दशावतार नाट्यप्रयोग सुरु असतानाच कलाकाराला हृदयविकाराचा धक्का बसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित कलाकार नेहमीच्या  जोशात प्रयोगातील संवाद म्हणत होता. संवाद म्हणताना आधी काही क्षण तो हलला, तरीही त्याने आवेशात प्रयोग सुरुच ठेवला. मात्र त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच तो स्टेजवर कोसळला.

सुदैवाने जीव वाचला

नाट्यप्रयोग सुरु असतानाच कलाकार कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कलाकार व्यासपीठावर कोसळत असतानाच सहकलाकाराने त्याला पकडत सावरण्याचा प्रयत्न केला. हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या कलाकाराला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. सध्या या कलाकाराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कलाकाराचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राणेंच्या वाढदिवसानिमित्त दशावतार महोत्सव

सिंधुदुर्गात आयोजित दशावतार महोत्सवात शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गातील रेडी येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Yavatmal : बहिणीच्या लग्नाची धामधूम, भावाचा ह्र्दयविकाराने मृत्यू; श्रीरामपुरातील धक्कादायक घटना

Beed | घाटनांदूर रेल्वे स्टेशन मास्तरचा हृदय विकाराने मृत्यू, दोन रेल्वे खोळंबल्याने घटना उघडकीस

नंदुरबारमध्ये बसमधील प्रवाशाचा heart attack ने मृत्यू; रुग्णालयाकडे गाडी वळवली पण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें