देवगडातील कुणकेश्वरची यात्रा रद्द, तर कर्नाटकातील मायाक्का चिंचणी यात्रा रद्द झाल्याने सांगलीचे भाविक खट्टू

सिंधुदुर्गातील देवगडमध्ये 11 ते 13 मार्च दरम्यान प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा आयोजित करण्यात आली होती. (Sindhudurg Devgad Kunakeshwar Yatra Cancelled)

देवगडातील कुणकेश्वरची यात्रा रद्द, तर कर्नाटकातील मायाक्का चिंचणी यात्रा रद्द झाल्याने सांगलीचे भाविक खट्टू
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थान
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 12:00 PM

सांगली/सिंधुदुर्ग : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना देवगडमधील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. तर कर्नाटक सरकारने मायाक्का चिंचणी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून भाविकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आल्यामुळे भाविक खट्टू झाले आहेत. (Sindhudurg Devgad Kunakeshwar Yatra Cancelled)

कुणकेश्वरची यात्रा अखेर रद्द

सिंधुदुर्गातील देवगडमध्ये 11 ते 13 मार्च दरम्यान प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

50 भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी

या बैठकीला शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली असली, तरी कोव्हिड संदर्भातील सर्व निकषांचे पालन करुन मंदिर समिती विश्वस्तांसह केवळ 50 भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे इतर धार्मिक विधी पार पाडणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

कर्नाटक सरकारकडून मायाक्का चिंचणी यात्रा रद्द

दुसरीकडे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने मायाक्का चिंचणी यात्रा रद्द केली आहे. तसेच या यात्रेसाठी महाराष्ट्रातून भाविकांनी येऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यात्रेसाठी निघालेल्या सांगली, मिरजेतील भाविकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले आणि परत पाठवून दिल्याने भाविक चांगलेच नाराज झाले आहेत.

बहुतांश भाविक बैलगाडी, घोडागाडीतून दरवर्षीप्रमाणे दोन दिवस आधी घरातून बाहेर पडले आहेत. ग्रामीण भागातून हौसेने गाड्या, बैल सजवून तरुण, वयस्कर चिंचणीच्या दिशेने चारी बाजूने निघाले आहेत. यात्रा रद्द झाल्याचे जाहीर झाल्यावरही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही.

भाविक अर्ध्या वाटेवरुन माघारी

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. तर म्हैसाळ, कागवाड, कोगनोळी या ठिकाणी पोलिसांनी गाडीवाल्याना अडवून मागे फिरायला भाग पाडल्याचे भाविक एकमेकांना सांगत आहेत. अनेकांनी वाटेतच मुक्काम टाकला आहे. तर अनेक भाविकांच्या घरच्या मंडळींचा जीव टांगणीला लागला आहे.

संबंधित बातम्या :

सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

(Sindhudurg Devgad Kunakeshwar Yatra Cancelled)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.