जळगावात कोरोनाचा कहर, रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली

देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा सुरू (Corona Positive Patient Jalgaon) आहे.

जळगावात कोरोनाचा कहर, रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली

जळगाव : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरू (Corona Positive Patient Jalgaon) आहे. काल (30 एप्रिल) तब्बल 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जळगावात आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 37 वर पोहचली आहे. यापैकी 10 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात भीतीचं वातावरण (Corona Positive Patient Jalgaon) आहे.

जळगाव आणि भुसावळमध्ये प्रत्येकी 2 तर अंमळनेर आणि पाचोऱ्यात प्रत्येकी 1 असे एकूण 6 रुग्ण काल आढळून आले. दरम्यान, जळगावात 26 दिवस एकही नवा रुग्ण नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसात 4 रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली असून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 6 वर गेली आहे.

जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या एकूण 68 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल काल रात्री प्राप्त झाले. त्यातील 62 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर 6 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा तसेच 38 वर्षीय महिला त्याचप्रमाणे अंमळनेर येथील 55 वर्षीय पुरुष, पाचोरा येथील 56 वर्षीय पुरुष तर जळगाव येथील 30 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

काल रात्री प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 68 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अंमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित सर्व जळगावच्या आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 10 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 459 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1773 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lock Down | ‘मैं समाज का दुश्मन हूं…’, संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून धडा

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *