पंढरपूरजवळ भीषण अपघात, मुंबईच्या सहा भाविकांचा मृत्यू

पंढरपूर : भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर जवळ घडली आहे. पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर घाडगे वस्तीजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये मृत व्यक्ती मुंबईतील घाटकोपरचे असल्याची माहिती आहे. एसटी बस आणि भाविकांच्या ईको कारची घडक होऊन ही घटना घडली. पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून काही अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या ईको कारने एसटीला धडक दिली. […]

पंढरपूरजवळ भीषण अपघात, मुंबईच्या सहा भाविकांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पंढरपूर : भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर जवळ घडली आहे. पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर घाडगे वस्तीजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये मृत व्यक्ती मुंबईतील घाटकोपरचे असल्याची माहिती आहे. एसटी बस आणि भाविकांच्या ईको कारची घडक होऊन ही घटना घडली.

पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून काही अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या ईको कारने एसटीला धडक दिली. या भीषण अपघातात इको कारमधील सुरेश कोकणे, सचिन कोकणे, सविता कोकणे, प्रथम  सावंत, आर्यन कोकणे, श्रद्धा सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून एक 16 ते 17 वर्षांची मुलगी धनश्री सावंत गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीला पंढरपूरला देवदर्शनासाठी येणाऱ्या ईको कारने जोरात धडक दिली. ईको कारचा नंबर MH 03 AZ 3116 असून हे सर्व जण घाटकोपर भटवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलीवर सोलापुरात पुढील उपचार सुरु आहेत.

मुंबईमधील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे यांचा लक्ष्मी केटरर्स फर्म आहे. ते आपल्या कुटुंबासह अक्कलकोट येथून पंढरपूरकडे दर्शनाला जात होते. यावेळी शनिवारी दुपारी साडेचारच्या आसपास पंढरपूरजवळ हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार थेट बसमध्ये घुसली होती. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने मदत केली. जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी दाखल केलं.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.