वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिमुरड्याला चिरडलं!

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिमुरड्याला चिरडलं!

वर्धा : जिल्ह्याच्या लहान वणी येथे वाळू घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने 8 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक एक किलोमीटरपर्यंत पुढे नेला आणि तेथेच ट्रक सोडून पसार झाला. सोहम दुधपोळे (रा. कोसुर्ला) असे मृत मुलाचे नाव आहे.

मृत सोहम आपल्या आजीसोबत वणी येथील नातेवाईकांच्या घरी आला होता. सोहम घराजवळील रस्ता ओलांडत असतानाच वाळू घेऊन भरधाव चाललेल्या ट्रकने त्याला चिरडले. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.

विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर गौण खनिज वाहतुकीला परवानगी नाही. असे असतानाही या मार्गावर दिवस-रात्र अवैध वाहतूक सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या प्रकाराकडे लक्ष देत कारवाईची मागणी केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *