तस्करांची आयडिया, दारु लपवण्यासाठी चक्क दारुचे तळे

नागपूर:  शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी त्याहीपुढे जाऊन डोके लढवले. त्यांनी चक्क दारुतळे निर्माण केले. नागपुरातील सदरजवळच्या भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा अजब प्रकार उघडकीस आला. अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही ‘योजना’ पाहून धक्काच बसला. दारु तस्करांनी चक्क तळे बनवून त्यामध्ये दारु लपवल्याचं दिसून आलं. …

तस्करांची आयडिया, दारु लपवण्यासाठी चक्क दारुचे तळे

नागपूर:  शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी त्याहीपुढे जाऊन डोके लढवले. त्यांनी चक्क दारुतळे निर्माण केले. नागपुरातील सदरजवळच्या भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा अजब प्रकार उघडकीस आला. अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही ‘योजना’ पाहून धक्काच बसला. दारु तस्करांनी चक्क तळे बनवून त्यामध्ये दारु लपवल्याचं दिसून आलं.

याप्रकारावरुन दारु तस्कर आपला गुन्हा लपवण्यासाठी कोणकोणत्या आयडिया लढवू शकतात, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

सध्या निवडणुकीचं वारं आहे. निवडणुकीत दारुचा वापर सर्रास केला जातो. अनेक ठिकाणी दारु पकडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आतापर्यंत पकडलेल्या दारुपैकी नागपूरमधील दारुच्या तळ्याचा किस्सा सर्वात आश्चर्यकारक आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *