Video | सोलापूरच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळाची फटका, द्राक्ष मणी फुटण्याची शक्यता

सोलापूरमध्येअवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. Solapur Grapes unseasonal rain

  • रवी लवेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर
  • Published On - 11:32 AM, 18 Feb 2021
Video | सोलापूरच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळाची फटका, द्राक्ष मणी फुटण्याची शक्यता
सोलापूर द्राक्ष नुकसान

सोलापूर: राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाला बुधवारी रात्री पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये द्राक्ष बागांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री पासून ढगाळ वातवरण आहे. सकाळी पुन्हा अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली असून परिसरात ढगाळ वातावरण झाले आहे. (Solapur Grapes farmers facing problems due to unseasonal rain)

अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. द्राक्ष घडावर पावसाचे पाणी थांबल्याने द्राक्ष मणी आता दोन दिवसात फुटतील. त्यामुळे याबागांमधून उत्पादन होण्याऐवजी आत्ता नुकसान होणार आहे. जिथे आर्थिक उत्पन्न मिळायचे तिथे तोटा होणार आहे. कासेगाव, लक्ष्मी टाकळी, बोहाळी, उंबरगाव.,खर्डी या गावातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागाना फटका बसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच आज दुपारी आणि उद्या पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

शेतकऱ्यांवर संकटांची मालिका

सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टीमुळं द्राक्ष बागांमध्ये पाणी घुसलं होते. अतिवृष्टीच्या काळात द्राक्ष बागांचं मोठया प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्या संकटातून सावरत असतानाच अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

पंढरपूर परिसरातील शेतकरी फार अडचणीत आहे. बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर, येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस होणार अल्याची शक्यता असल्यानं नुकसान वाढण्याची भीती सुरेश टिकोरे,द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं सांगितलं आहे.

सांगलीमध्येही पावसाची हजेरी

सांगली व आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रीच्या सुमारास अचानक पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात नागरिकांना आता रेनकोट व छत्र्या बाहेर काढण्याची पाळी येणार आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीतही वाढ झालेली आहे.

वाशिममध्येही पाऊस

वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील राजुरा,अमनवाडी परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू,पिकासह भाजीपाला पिकाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या:

पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

Maharashtra Weather : पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, गारांसह मुसळधार पावसाची शक्यता

(Solapur Grapes farmers facing problems due to unseasonal rain)