Solapur Corona | 40 कोरोना बळींची माहिती लपवली, सोलापुरातील तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

सोलापुरातील तब्बल 40 कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीन रुग्णालयांनी महापालिका यंत्रणेकडे पाठवला नाही.

Solapur Corona | 40 कोरोना बळींची माहिती लपवली, सोलापुरातील तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 11:15 PM

सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक माहिती (Solapur Hospitals Hides Corona Deaths) पुढे आली आहे. सोलापुरातील तब्बल 40 कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीन रुग्णालयांनी महापालिका यंत्रणेकडे पाठवला नाही. जून आणि मे महिन्यात मृत झालेल्या 40 लोकांची यादी आज (22 जून) पालिकेला (Solapur Hospitals Hides Corona Deaths) प्राप्त झाली.

कम्युनिकेशन गॅपमुळे मृतांचा आकडा पालिकेपर्यंत पोहोचला नाही, अशी माहिती आहे. महानगर पालिकेच्या यंत्रणेत 40 कोरोनाबाधित मृतांची आज अखेर नोंद करण्यात आली. त्यामुळे सोलापुरातील कोरोना बळींची संख्या 213 वर पोहोचली आहे.

कोरोना बळींची माहिती दडविल्याप्रकरणी सिव्हील हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, मार्कंडेय रुग्णालयाला पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, ज्या डॉक्टरांकडे या तीन रुग्णालयांची जबाबदारी होती, त्यांच्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

Solapur Hospitals Hides Corona Deaths

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 35 हजार 796 वर

राज्यात आज (22 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 721 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO :

Solapur Hospitals Hides Corona Deaths

संबंधित बातम्या :

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

कोरोनामुळे नोकरी गेली, 4-6 लाख कमावणाऱ्या पायलटवर डिलिव्हरी बॉय होण्याची नामुष्की

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.