राष्ट्रवादीचे माळशिरसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन

मुंबई/सोलापूर : माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. गेल्या तीन- चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. दरम्यान, हनुमंतराव डोळस यांच्या पार्थिवावर माळशिरस तालुक्यातील दसुर या …

राष्ट्रवादीचे माळशिरसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन

मुंबई/सोलापूर : माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. गेल्या तीन- चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती.

दरम्यान, हनुमंतराव डोळस यांच्या पार्थिवावर माळशिरस तालुक्यातील दसुर या गावी उद्या  सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हनुमंतराव डोळस हे माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रहिवाशी होते. 2009 पासून माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून, डोळस या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.

कोण होते हनुमंतराव डोळस?

  • हनुमंतराव डोळस हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार होते.
  • पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेवर निवडून गेले, 2014 मध्येही राष्ट्रवादीकडूनच आमदार
  • चर्मकार महामंडळाचं अध्यक्षपदही सांभाळलं
  • विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख
  • 2009 मध्ये माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर मोहिते पाटलांकडूनच डोळस यांना उमेदवारी
  • गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आजाराने ग्रस्त, मुंबईत उपचार घेतले
  • अखेर 30 एप्रिल रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

शरद पवारांचा दुष्काळ दौरा रद्द

आमदार हनुमंतराव डोळस यांच्या निधनामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपला दुष्काळ दौरा रद्द केला. शरद पवार यांचा मंगळवेढा, सोलापूर आणि उस्मानाबाद असा नियोजित  दुष्काळी दौरा होता, तो आता रद्द करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *