धावत्या गॅस टँकरमध्ये चालक बेशुद्ध, जिगरबाज पोलिसाने शिताफीने टँकर थांबवला, सोलापुरात थरार

चालक बेशुद्ध पडल्याचे दिसल्याने पोलीस नाईक संजय चौगुले मोठ्या शिताफिने धावत्या गॅस टँकरवर चढले आणि ब्रेक मारुन त्यांनी गॅस टँकर थांबवला.

धावत्या गॅस टँकरमध्ये चालक बेशुद्ध, जिगरबाज पोलिसाने शिताफीने टँकर थांबवला, सोलापुरात थरार

सोलापूर : धावत्या गॅस टॅंकरचा चालक बेशुद्ध पडल्याचे समजल्यानंतर पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यात शिरले. चौगुले यांच्या धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली. सोलापुरात घडलेल्या या घटनेनंतर पोलीस नाईक संजय चौगुले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालकमंत्री दत्ता भरणे यांनीही चौगुलेंचे कौतुक केले आहे. (Solapur Police Naik Sanjay Chaugule stops running Gas Tanker after driver fainted)

सोलापूर विभागातील महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय चौगुले (बक्कल नंबर 225) सावळेश्वर टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना समोरुन एक गॅस टँकर वेडावाकडा येताना दिसला. ते पाहून चौगुले यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला, पण चालक हा बेशुद्ध दिसल्याने चौगुले मोठ्या शिताफिने धावत्या गॅस टँकरवर चढले. चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून ब्रेक मारुन त्यांनी गॅस टँकर थांबवला.

नेमकं काय घडलं?

मुंबईहून गॅसने भरलेले टॅंकर पाकणी येथील भारत गॅसच्या डेपोवर दररोज ये-जा करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी (9 सप्टेंबर) मुंबईहून चार टॅंकर सोलापूरच्या दिशेने पाठोपाठ येत होते. सावळेश्वर टोलनाका पार करुन तीन टॅंकर पुढे गेले, तर एक मागेच राहिला.

टोल भरुन टॅंकर बूथमधून पास झाला. मात्र तो सरळ न येता नागमोडी वळणे घेत येत होता. त्यामुळे संजय चौगुले यांचे त्या टॅंकरकडे लक्ष गेले. टॅंकर चालक दिसत नसल्याने चौगुले चकित झाले. गॅस टॅंकर टोलनाक्या शेजारील कॅन्टीनच्या दिशेने जात असल्याने चौगुले टॅंकरच्या दिशेने धावले. तेव्हा टॅंकर चालक आसनावर बेशुद्ध पडलेला दिसला.

संजय चौगुले स्वत:चा जीव धोक्यात घालत टॅंकरवर चढले. अ‍ॅक्‍सिलेटरवर असलेला चालकाचा पाय काढला आणि स्वत:चा पाय ब्रेकवर ठेवला आणि टॅंकर थांबवला. त्यानंतर पोलिसांनी टॅंकरच्या मालकास फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर उर्वरित तीन चालक टोलवर पोहचले आणि त्यांनी टॅंकर पुढे नेला. (Solapur Police Naik Sanjay Chaugule stops running Gas Tanker after driver fainted)

हेही वाचा : कुशल बद्रिकेने इशारा दिलेल्या ठाण्यातील ‘त्या’च जागी ट्रकने महिलेला उडवले

(Solapur Police Naik Sanjay Chaugule stops running Gas Tanker after driver fainted)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *