पवारांनी सूत्रं सोपवलेल्या नेत्यावरच राष्ट्रवादी नगरसेवकांकडून आरोपांची ‘फायरिंग’? महेश कोठेंची तब्येत डाऊन

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महेश कोठे यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कोठे यांनी नवीन प्रभाग रचनेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात होते. मात्र या प्रभाग रचनेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी आणि नगरसेवकांत नाराजी होती

पवारांनी सूत्रं सोपवलेल्या नेत्यावरच राष्ट्रवादी नगरसेवकांकडून आरोपांची 'फायरिंग'? महेश कोठेंची तब्येत डाऊन
शरद पवार, महेश कोठे
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:45 AM

सोलापूर : आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत (Solapur Municipal Corporation Election) विजय मिळवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. शहरात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर शहरातील पक्षाची सर्व सूत्रे महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्याकडे दिली आहेत. मात्र प्रभाग रचनेत आमचा प्रभाग पूर्णपणे तोडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाने बैठकीत केला. त्यानंतर मात्र अचानक बैठक सुरु असताना नगरसेवक महेश कोठे यांची तब्येत खालावली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. महेश कोठे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता.

काय आहे प्रकरण?

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महेश कोठे यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कोठे यांनी नवीन प्रभाग रचनेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात होते. मात्र या प्रभाग रचनेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी आणि नगरसेवकांत नाराजी होती. ती नाराजी दूर करुन एकदिलाने काम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक शेखर माने यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीत ही वादावादी झाल्याचे बोलले जात आहे.

धावपळीमुळे थकवा आल्याचा दावा

दरम्यान महेश कोठे यांनी आपण व्यवस्थित असून मागील आठवडाभर मुंबई-पुणे येथे धावपळ झाल्याचे थोडासा थकवा आल्याचे सांगितले. मात्र पक्षात अंतर्गत कुरबुरी असल्यास सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणताना दमछाक तर होणार नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कोण आहेत महेश कोठे?

महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. ते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव. 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत शिवसेनेकडून त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा फटका बसला. 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने सोलापूर शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

माझ्याविरोधात सामना करण्यास तयार रहा, पराभूत झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेतो, सोलापुरात ‘राजकीय दंगल’, कोठेंचं देशमुखांना आव्हान

जे आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्यांना टोला

कोठेंचा पक्षप्रवेश लटकला, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.