Rajyasabha Election : राजकीय वातावरणामुळे आजुबाजूचे लोक टेन्शनमध्ये, संभाजीराजेंचे पुत्र शहाजीराजे यांची प्रतिक्रिया

चालू असलेल्या घडामोडींमुळे माझ्या आजूबाजूचे लोक टेंशनमध्ये आहेत. राजेंचं काय होणार? राजे काय करणार? राजे माघार घेणार की काय? मात्र या सगळ्यामुळे आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Rajyasabha Election : राजकीय वातावरणामुळे आजुबाजूचे लोक टेन्शनमध्ये, संभाजीराजेंचे पुत्र शहाजीराजे यांची प्रतिक्रिया
राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आजुबाजूचे लोक टेन्शनमध्ये, संभाजीराजेंचे पुत्र शहाजीराजे यांची प्रतिक्रियाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 3:15 PM

सोलापूर : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajyasabha Election) जोरदार घमासान सुरू आहे. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या छत्रपती संभजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावरून शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीकाही होत आहे. अनेक मराठा संघटना या शिवसेनेविरोधात आक्रमक झाल्या आहेत. अशातच आम्ही संभाजीराजे यांचे पुत्र शहाजीराजे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते म्हणाले, चालू असलेल्या घडामोडींमुळे माझ्या आजूबाजूचे लोक टेंशनमध्ये आहेत. राजेंचं काय होणार? राजे काय करणार? राजे माघार घेणार की काय? मात्र या सगळ्यामुळे आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीचा सस्पेन्स संपत नाहीये. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी खासदार संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. मात्र त्यातूनही मार्ग निघाला नाही.

राजकीय घडामोडींबाबत बोलण्यास नकार

या सर्व घडामोडींबाबत बोलताना शहाजीराजे म्हणाले,  काल रात्रीदेखील मी आणि आई घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचे रुटीन लाईफ सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडीवरुन लक्षात येतंय की संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे. राजकारणाचे टेंशन रोजच्या जीवनात आणणे हे मला पटत नाही. कारण आम्ही जर खूष नसलो तर लोकांसाठी कसे काम करु? अशा भावना संभाजीराजे यांच्या राजकीय घडामोडीबाबत मुलगा म्हणून शहाजीराजेंनी व्यक्त केल्या आहेत. तसेच राजकीय घडामोडीबाबत थेट बोलण्यास मात्र नकार दिला आहे.

शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल

सुरूवातील शिवसेनेने संभाजीराजे यांना ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना थेट शिवसेनेत येण्याचे निमंत्रणही धाडले. मात्र संभाजीराजे हे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. त्यानंतर मात्र संजय राऊतांनी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आणि हा सस्पेन्स आणखी वाढला. तसेच शिवसेनेकडून संजय राऊतांचं नाव आधीच फिक्स झालं होतं. आज शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आता यातील कोण माघार घेणार की निवडणूक अशीच होणार? याकडे अनेक राजकीय नजरा लागल्या आहेत. काही दिवसातच हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.