Solapur: तडीपार बॉबीला अटक करत असताना ‘ती’ पोलिसांच्या हाताला चावली! 3 महिलांसह 5 जणांवर गुन्हा

Solapur Crime: अटकेची कारवाई करतेवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरु आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Solapur: तडीपार बॉबीला अटक करत असताना 'ती' पोलिसांच्या हाताला चावली! 3 महिलांसह 5 जणांवर गुन्हा
सोलापुरात मिरवणुकीदरम्यान घडली घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:12 AM

सोलापूर: तडीपार बॉबी शिंदेला अटक करण्याची कारवाई पोलीस (Police Action in Solapur) करत होते. मात्र यावेळी पोलिसांवरच हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी (Solapur Police) तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अटकेची कारवाई करतेवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा धक्कादायक प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022) कााढणाऱ्या आलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान घडला. आंबेडकर चौकात ही घटना घडली. सचिन ऊर्फ बॉबी शिंदे, किर्ती शिंदे, सुलोचना शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे आणि अन्य दोन अनोळखी अशा एकूण पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी एक तडीपार असलेला सचिन उर्फ बॉबी शिंदे मिरवणुकीत आढळून आला. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने दोन वर्षाकरीता सचिन उर्फ बॉबी शिंदेला तडीपार केलं होतं. अखेर तो मिरवणुकीत दिसल्यानं त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले.

पोलिसांसोबत कुटुंबीयांची हुज्जत

पोलिसांनी तडीपार बॉबीला मिरवणुकीत पकडलंही आणि नंतर पोलीस ठाण्यात आणलं. मात्र त्याआधी त्याला पोलीस ठाण्यात आणताना त्याच्याच कुटुंबातील लोकांनी तीव्र विरोध केला. पोलीस कारवाई करत असताना सगळेजण पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले. बॉबीला घेऊन जाऊ नका, असंही म्हणत होते. दरम्यान, पोलीस नाईक रविराज काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्याशी हुज्जत घालणाऱ्यांनी झटापट केली. रविराज काळे यांच्या शर्टाची कॉलर पकडून ओढाओढी करू लागले.

…आणि हाताचा चावा!

यावेळी एकानं पोलिसांच्या डाव्या हाताला चावा घेतला. बॉबीला सोड नाही तर बघ असं म्हणत शिवीगाळ करून धमकावण्यातही आलं. त्यामुळे शासकीय कामात अडथळा करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची फिर्याद पोलिसा स्थानकात करण्यात आली. पोलीस नाईक रविराज काळे यांनी ही फिर्याद दिली होती. आता याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी एकूण तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातील इतर बातम्या :

Lemon Rate : सब गोलमाल..! उत्पादकांपेक्षा व्यापारीच मालामाल, काय आहे बांधावरची स्थिती?

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

Raj Thackeray : राज ठाकरेंना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंचं आव्हान, आपल्या वर्गाला बसण्याचाही सल्ला!

पाहा Video: साताऱ्यात सदावर्तेंनी कॉलर उडवली!

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.