कोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

कोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन …

कोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

कोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन मुलांसोबत राहत होत्या. गुरुवारी दिवसभर स्वाती आजूबाजूच्या परिसरात न दिसल्याने शेजारील लोकांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. त्यावेळी दरवाजा उघडताच शेजाऱ्यांना विभावरी (4) आणि शिवांश(1) या दोन चिमुरड्यांचे मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आले. तर त्यांच्या बाजूलाच स्वाती यांचाही मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

स्वाती यांचे पती सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत. पाटील कुटुंबीय अवघ्या वर्षभरापूर्वी नेर्ले गावात राहायला आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी छोटा मुलगा शिवांशचा वाढदिवसही थाटामाटात साजरा केला होता. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या का केली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वाती यांच्या आत्महत्येवरुन माहेरच्यांकडून आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत सध्या पोलिस तपास करीत आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *