कोल्हापूर जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी सुरु, पुणे-बंगळुरु महामार्ग अद्यापही बंद

पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे गेल्या 5 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे-बंगळुरु हा महामार्ग अद्यापही ठप्प आहे. रविवारी 11 ऑगस्टला दिवसभरात केवळ पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्याच या महामार्गावरुन सोडण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी सुरु, पुणे-बंगळुरु महामार्ग अद्यापही बंद

कोल्हापूर : शहरातील पूराच्या पाण्याची पातळी (Sangli Kolhapur Flood) आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग हा अत्यावश्यक गोष्टींच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्टला दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. महामार्गावर अद्यापही पाणी असल्याने खबरदारी म्हणून जेसीबीची व्यवस्थाही करण्यात आली. अद्यापही या महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी असून पुराच्या पाण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे इतर वाहनांना या मार्गावरुन सोडण्यात आलेलं नाही. सुरक्षा पाहणी करुन कदाचित उद्या सोमवारी (12 ऑगस्ट) सायंकाळी वाहतूक सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात (Sangli Kolhapur Flood) पूरस्थिती आहे. नद्यांना आलेल्या महापुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कोल्हापुरात अनेक रस्ते, महामार्ग हे पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे गेल्या 5 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे-बंगळुरु हा महामार्ग अद्यापही इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गासोबतच कोल्हापूरच्या इतर रस्त्यांवरही पुराचं पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर यादरम्यान 16-18 हजार वाहनं थांबून होती. इतर रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून होत्या. पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक बंद पडली. त्यानंतर आज (5 ऑगस्ट) कोल्हापुरातील काही मार्गावरील पाणी ओसरलं आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर काही मार्गांवर अद्यापही पूरस्थिती कायम असल्याने वाहतूक ठप्प आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते मार्ग वाहतुकीसाठी सुरु, कोणते अद्यापही ठप्प

  • रस्त्यावरील पाणी ओसरल्याने गारगोटी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरु, गेल्या आठ दिवसांपासून गारगोटीचा कोल्हापूरशी संपर्क तुटला होता
  • गारगोटी-कुर-मडिलगे-कोल्हापूर मार्गावरही वाहतूक सुरु
  • नऊ दिवसांपासून बंद असलेला गारगोटी-मुदाळतिट्टा-कोल्हापूर मार्ग आज (11 ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला
  • मुरगुड-मुदाळतिट्टा हा मार्गही लवकरच वाहतुकीसाठी खूला होण्याची शक्यता
  • मुरगुड-चिमगाव-गंगापूर-मडिलगे-गारगोटी आणि कोल्हापूर मार्गे वाहतूक सुरू
  • कोगनोळीपासून निपाणीपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला
  • कडगाव, शेळोली मार्गावर वहातूक सुरू
  • भुदरगड तालुक्यातील सर्व मार्गावर वाहतूक पूर्ववत सुरु, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
  • कापशी-मुरगुड मार्गावर सरपिराजी तलाव्याच्या सांडव्यावरुन पाण्याचा जास्त विसर्ग होत आसल्याने वाहतूक बंदच
  • दरम्यान दुधगंगा नदीचे कोंगनोळी येथे रोडवर आलेले पाणी अजुनही कमी झाले नसल्याने कागल शहराकडे जाण्याचा रस्ता अद्यापही बंद

VIDEO :  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *