मुलाचा आईवरच बलात्कार, सातारा जिल्ह्यातील संतापजनक घटना

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 18:16 PM, 17 May 2019

सातारा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या एका गावात घडलाय. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केलं. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय. भुईंज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम मुलाची आई आणि वडील एका लग्नासाठी गावात गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी पुढे आली. यावेळी तिचा मुलगा हा घराच्या ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तोही घरात गेला आणि त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वतःच्या आईवरच बलात्कार केला.

आईने आरडाओरडा केला आणि शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. वडिलांनी मुलाला केलेल्‍या कृत्‍याचा जाब विचारल्यावर मुलाने वडिलांनाही दगड मारून जखमी केलं. घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात स्‍वत:च्या मुलाने केलेल्‍या या घृणास्‍पद कृत्‍याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.