Sugarcane Workers Registration | उसतोड कामगार नोंदणीसाठी आता मोबईल अॅप, वेब पोर्टल, शासन निर्णय जारी

धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल अ‍ॅप तयार करून त्याव्दारे ही नोंदणी करण्यात येणार आहे.

Sugarcane Workers Registration | उसतोड कामगार नोंदणीसाठी आता मोबईल अॅप, वेब पोर्टल, शासन निर्णय जारी
SUGARCANE WORKERS
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 8:41 PM

मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल अ‍ॅप तयार करून त्याव्दारे ही नोंदणी करण्यात येणार आहे.

कामगार नोंदणीसाठी आता वेब पोर्टल, मोबाईल अ‍ॅप 

याबाबतचा शासन निर्णय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार आज निर्गमित करण्यात आलाय. हे वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडे (महाआयटी) सोपवण्यात आले आहे. महाआयटीमार्फत कमीत कमी वेळेत हे वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅप तयार करून कार्यान्वित करण्यात यावे तसेच सध्या ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी ऑनलाईन करून तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासाठी महाआयटीला आवश्यक निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वसतीगृह उभारणी, इमारत अधिग्रहण प्रक्रिया सुरु

मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम केवळ कागद व घोषणापूरते मर्यादित राहिले होते. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. प्रथमच राज्यात ऊसतोड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतीगृह उभारणी, इमारत अधिग्रहण आदी प्रक्रियादेखील सुरू आहे.

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एका मोबाईल अ‍ॅपचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यभरातील ऊसतोड कामगारांच्या डिजिटल नोंदणीसाठी वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप, कोण आहे दाढीवाला कासिफ खान?

‘फर्जीवाडा केलाय म्हणून समीर वानखेडे मुंबई पोलिसांना घाबरत आहेत’, नवाब मलिकांची खोचक टीका

IPL 2022: आगामी आयपीएल 2022 च्या लिलावासंबधी मोठी माहिती समोर, नव्या दोन संघाच्या समावेशानंतर लिलावप्रक्रियेत महत्त्वाचे बदल

(special app and web portal for sugarcane workers registration decision taken by dhananjay munde)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.