विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांना पितृशोक

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे वडील नारायणराव नांगरे पाटील यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. मंगळवारी दुपारी चार वाजता नारायणराव यांनी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नारायणराव नांगरे पाटील यांचे कोकरूड (ता शिराळा, जि. सांगली) हे मूळगाव आहे. या भागातील प्रसिद्ध पैलवान अशी त्यांची ओळख होती. राजकारणात …

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे वडील नारायणराव नांगरे पाटील यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. मंगळवारी दुपारी चार वाजता नारायणराव यांनी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
नारायणराव नांगरे पाटील यांचे कोकरूड (ता शिराळा, जि. सांगली) हे मूळगाव आहे. या भागातील प्रसिद्ध पैलवान अशी त्यांची ओळख होती. राजकारणात ठसा उमटवताना कोकरूड गावचे सरपंच ते शिराळा पंचायत समितीचे सभापती अशी पदे त्यांनी भूषवली. विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक म्हणूनही परिचित होते.
vishwas nangare patil, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांना पितृशोक
औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक पद्माकरराव मुळे यांचे व्याही होते. नारायणराव नांगरे-पाटील यांच्यावर कोल्हापूर येथे पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोकरूड या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे आदर्श असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रवासात त्यांच्या वडिलांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. अनेक भाषणांमध्ये नांगरे पाटलांनी त्यांच्या वडिलांनी कशी प्रेरणा दिली ते बोलून दाखवलं आहे. यूपीएससीचा अभ्यास करत असताना नारायणराव यांनी कसं आपल्याला बळ दिलं, त्याबाबत विश्वास नांगरे पाटील नेहमी सांगत असतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *