शिमगोत्सवाची तयारी, मुंबईतून कोकणात दररोज 40 गाड्या सोडणार

होळी सणासाठी 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत.

शिमगोत्सवाची तयारी, मुंबईतून कोकणात दररोज 40 गाड्या सोडणार
कोकण होळी

रत्नागिरी : कोकणातला मुख्य सण म्हणजे शिमगोत्सव. (Shimgostav) मुंबईकर चाकरमान्यांसाठी शिमगोत्सव हा मानाचा उत्सव मानला जातो. या होळी सणासाठी (Konkan Holi) 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमधून चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेल्याच आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोना रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जायचं असेल तर हा रिपोर्ट बंधनकारक आहे. (Special ST buses to konkan from Mumbai for Holi Shimgostav)

रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमान्यांसाठी दररोज 40 एसटी गाड्या होळीनिमित्त धावणार आहेत. या गाड्यांमधून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली. चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठीही या गाड्या उपलब्ध असणार आहेत. पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केलं आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांनी कोकणात येण्याबाबत साशंक आहेत.

गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात जायला निघालेल्या चाकरमन्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 8 दिवसांपूर्वीच यासंदर्भातील आदेश जारी केले.

त्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

गणपतीनंतर शिमग्यालाही निर्बंध

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्यामुळे चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण गावी जाऊ शकले नव्हते. गपणती आणि होळी हे कोकणातील दोन मोठे सण मानले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.

यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रशासनाने येत्या दोन-तीन दिवसांची डेडलाईन देण्यासाठी आता उर्वरित दिवसांमध्ये कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

होळीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अन्यथा गावात एन्ट्री नाही

कोकणात शिमग्याच्या उत्साहावर पाणी; पालखीवर निर्बंध, गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI