ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत महिला जखमी

मध्य रेल्वेच्या सर्व लोकल अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. लोकल वाहतुकीचा फटका जसा सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे. ठाणे स्थानकात पावसामुळे चेंगरांचेंगरी झाल्याने काही महिला प्रवाशी जखमी झाल्या आहे. त्यांना तात्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत महिला जखमी

मुंबई : मुंबईसह राज्यभरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसयाला सुरुवात झाली होती. दिवसभर कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे सर्वच स्टेशनवर मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. नुकतंच ठाणे स्थानकात तुफान गर्दीमुळे चेंगरांचेंगरी झाली. यामुळे काही महिला प्रवाशी जखमी झाल्या आहे. जखमी महिलांना तात्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काल (30 जून) रात्रीपासूनच्या नवी मुंबई, ठाणे, वाशी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सायन आणि कुर्ल्यात रेल्वे रुळांवर पाणी साठलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. दरम्यान काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला, तरी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची फार गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे ट्रेनमध्ये महिलांना चढण्यास आणि उतरण्यास फार त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरी पाहायला मिळत आहे.

तसेच घाटकोपर स्थानकातही सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी महिला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे महिलांना ट्रेनमध्ये महिलांना धड चढता किंवा उतरताही येत नव्हते. दरम्यान अद्याप मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर ही स्थिती कायम पाहायला मिळत आहे.

तसेच दर मिनिटाला ठाणे स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे. वाढत्या गर्दीमुळे महिला प्रवाशांना ट्रेनसह प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरीसदृष परिस्थिती पहायला मिळत आहे. यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व लोकल अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. लोकल वाहतुकीचा फटका जसा सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवस अंसख्य मुंबईकरांचा लेटमार्क लागला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *