बजाजचा महाराष्ट्र स्कूटर उद्योग सुरु करा, अन्यथा जमीन परत घ्या, शिवेंद्रराजेंची अजित पवारांकडे मागणी

भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. Shivendra Raje Bhosale demand to Ajit Pawar

बजाजचा महाराष्ट्र स्कूटर उद्योग सुरु करा, अन्यथा जमीन परत घ्या, शिवेंद्रराजेंची अजित पवारांकडे मागणी

सातारा : भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. “उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकास कामांच्या बाबतीत कधी राजकारण करत नाही. एखाद्या तालुक्याची समस्या, शहराचा प्रश्न अजित पवार राजकारणाच्या नजरेतून पाहत नाहीत”, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. तर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर मुद्देसूद टीका करावी, व्यक्तिगत पातळीवर टीका नको, असं आवाहन त्यांनी केलं. (Shivendra Raje Bhosale demand to Ajit Pawar)

शरद पवार आणि अजित पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात ते साताऱ्यात आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांची शिवेंद्रराजे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतली.

यावेळी बोलताना शिवेंद्रराजेंनी मतदारसंघातील प्रलंबित समस्या संदर्भात दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. जिल्हा बँक, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रलंबित समस्या संदर्भात निवेदन दिलं. सातारा एमआयडीसीतील बजाजचा महाराष्ट्र स्कूटरचा उद्योग सुरु करावा, चाळीस एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सर्वात जास्त जमीन ही बजाजकडे आहे. लोकांना कारखाने उभे करण्यास जागा नाही. त्यामुळे त्यांनी तिथे काहीतरी करावी नाहीतर जागा एमआडीसीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांकडे केली.

त्याचबरोबर covid टेस्टिंग सेंटर सुरु करावं. सातारा जिल्हा बँकला देवस्थानच्या जमिनीवर पीक कर्ज देण्यास अडचणी आल्यात. महसूल विभागाचा अध्यादेशाने अडचणी आल्या आहेत. जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्य संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. यावर टीकाटीपण्णी झाली असून त्यांनी ये योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. टीका ही मुद्देसूद असावी. मात्र व्यक्तिगत पातळीवर टीका नसावी, असं आवाहन शिवेंद्रराजे यांनी केलं.

संबंधित बातम्या 

काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *