वारणानगरमध्ये किसानपुत्र आंदोलनाचे राज्यस्तरीय शिबीर

कोल्हापूर : किसानपुत्र आंदोलनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केलं गेलं आहे. किसानपुत्र आंदोलनाचे हे यंदाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर असणार आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारीला वारणानगर येथील ‘शेतकरी संसद’ भवनात हे शिबीर होणार आहे. शिबीरात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. वारणानगरच्या शेतकरी संसद भवनात 5 जानेवारीला सकाळी ठीक 10 […]

वारणानगरमध्ये किसानपुत्र आंदोलनाचे राज्यस्तरीय शिबीर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

कोल्हापूर : किसानपुत्र आंदोलनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केलं गेलं आहे. किसानपुत्र आंदोलनाचे हे यंदाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर असणार आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारीला वारणानगर येथील ‘शेतकरी संसद’ भवनात हे शिबीर होणार आहे. शिबीरात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. वारणानगरच्या शेतकरी संसद भवनात 5 जानेवारीला सकाळी ठीक 10 वाजता वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. महसूल विभागाचे माजी आयुक्त उमाकांत दांगट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली शिबीराचे उद्घाटन करतील. या राज्यस्तरीय शिबिरातील किसानपुत्र आंदोलनामध्ये शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्यावर उपाय, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे मुद्दे, कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, शेतकरी आणि संविधान या विषयांवर या शिबिरात विचार मंथन केले जाईल.

किसानपुत्र संघटना नव्हे आंदोलन किसानपुत्र आंदोलन ही कोणतीही संघटना नाही. किसानपुत्र हे एक आंदोलन असून या आंदोलनाच्या माध्यामातून शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत, यासाठी लढणाऱ्या शेतकाऱ्यांच्या मुला-मुलींचे आंदोलन आहे. मकरंद डोईजड या किसान पुत्राने 31 बी म्हणजेच 9 परिशिष्टच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हेच किसानपुत्र आता आवश्यक वस्तू कायद्याला आव्हान देण्याची तयारी करीत आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.