राज्यपालांबाबतच्या वक्तव्याचा खुलासा करावा, देवयानी फरादेंचा थेट पवारांवर हल्लाबोल

पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचं देवयानी फरांदे (Devyani Farade) म्हणाल्यात.

  • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 13:32 PM, 26 Jan 2021
राज्यपालांबाबतच्या वक्तव्याचा खुलासा करावा, देवयानी फरादेंचा थेट पवारांवर हल्लाबोल
devyani farande

नाशिक : भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलंय. राज्यपालांबाबत पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचं देवयानी फरांदे (Devyani Farade) म्हणाल्यात. त्या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. (Statement About The Governor Should Be Disclosed, Devyani Farade Direct Attack On Pawar)

राज्यपालांवर केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवारांनी खुलासा करावाः देवयानी फरांदे

राज्यपालांचा गोव्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असतानादेखील त्यावर राजकारण केलं जातंय. राज्यपालांवर केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवारांनी खुलासा करावा, पत्र लिहून राज्यपालांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत असून, मुख्यमंत्री आणि शरद पवारांना पत्र लिहिणार असल्याचंही देवयांनी फरांदे यांनी सांगितलंय.

काही लोक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करतायतः देवयानी फरांदे

केंद्र सरकारने आश्वासन देऊन देखील काही लोक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत आहेत, असं टीकास्त्रही देवयानी फरांदेंनी सोडलंय. तत्पूर्वी शरद पवारांनी राज्यपालांवरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले होते.

त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ: शरद पवार

”महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली होती. “राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” असंही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावलं होतं.

स्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे? शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

दरम्यान, याआधी शरद पवार यांनी राज्यपालांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरुनच त्यांना फटकारलं होतं. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावरही पवार नाराज

‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar Address Farmer: पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे काय?; शरद पवारांचा संतप्त सवाल

Farmer Protest : या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही : देवेंद्र फडणवीस

Statement About The Governor Should Be Disclosed, Devyani Farade Direct Attack On Pawar