रावसाहेब दानवेंच्या कार्यालयात चौथ्यांदा चोरी

जालना: भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चौथ्यांदा चोरी झाली आहे. रावसाहेब दानवे यांचं मोरेश्वर सप्लायर्स हे कार्यालय चोरट्यांनी फोडलं. तीन चोरट्यांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून, खिडकी फोडली आणि कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून सीडीआरसह कार्यालयातून 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या मदतीने दोन चोरांना अटक केली आहे. अर्जुनसिंग …

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयात चौथ्यांदा चोरी

जालना: भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चौथ्यांदा चोरी झाली आहे. रावसाहेब दानवे यांचं मोरेश्वर सप्लायर्स हे कार्यालय चोरट्यांनी फोडलं. तीन चोरट्यांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून, खिडकी फोडली आणि कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून सीडीआरसह कार्यालयातून 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या मदतीने दोन चोरांना अटक केली आहे. अर्जुनसिंग छगन सिंग भोंड आणि अर्जुनसिंग प्रीतिसिंग कलाणी अशी या चोरांची नावं आहेत. या दोघांनाही जालन्यातून अटक करण्यात आली. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयातील ही चोरीही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही तीन वेळा दानवेंच्या कार्यालयात चोरी झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *