खावटी योजनेची वस्तू खरेदी तात्काळ थांबवा, विवेक पंडित यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, असं झाल्यास सरकारचा मूळ हेतू साध्य होणार नाही असं विवेक पंडित यांनी पत्रात लिहलं आहे.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:47 PM, 25 Nov 2020

उसगाव : खावटी योजनेच्या माध्यमातून होणारी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तात्काळ थांबवावी अशी मागणी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित (Vivek Pandit) यांनी केली आहे. यासंदर्भात पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्रही लिहले आहे. यात वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, असं झाल्यास सरकारचा मूळ हेतू साध्य होणार नाही असं विवेक पंडित यांनी पत्रात लिहलं आहे. (Stop the purchase of Khawti scheme immediately Vivek Pandits letter to the Chief Minister)

विवेक पंडित यांनी पत्रात लिहलं की, ‘राज्य सरकारने आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी योजनेतून ज्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करून देणार आहे, त्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सरकारचा मूळ हेतू साध्य होणार नाही. यासाठी वस्तू खरेदीला तात्काळ स्थगिती द्यावी’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतकंच नाही तर ‘आदिवासींसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी न करता, जे 4 हजार रुपये अनुदान आहे. ती संपूर्ण रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. कारण आता बाजारपेठ ही खुली झालेली आहे, लाभार्थ्यांना हव्या त्या वस्तू ते बाजारातून खरेदी करू शकतात’ असेही पंडित यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

राज्य शासनाने खावटी योजनेबाबतचा शासन निर्णय दिनांक 9 सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यात खावटी ही जून ते सप्टेंबर या भुकेच्या काळात मिळणं अपेक्षित होतं. मात्र, हा काळ केव्हाच निघून गेला आहे. परंतु, अद्यापही आदिवासी विकास विभागाकडे लाभार्थ्यांच्या याद्या तयार नाहीत. आदिवासी विकास विभागाकडून याबाबत प्रचंड दिरंगाई आणि ढिलाई झालेली आहे. या ढिसाळ नियोजनामुळे उपासमारीचा काळ गेला. (Stop the purchase of Khawti scheme immediately Vivek Pandits letter to the Chief Minister)

काहींनी आत्महत्याही केल्या. त्यानंतर आता जर ही वस्तू खरेदी केली व त्याच्या वाटपासाठी शासनाचे प्रतिनिधी गेले तर लाभार्थी जागेवर भेटणार नाहीत. कारण, बहुसंख्य लोकांचं रोजगारासाठी स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असे पंडित यांनी म्हटले आहे. तसेच भूकेचा काळ निघून गेल्यानंतर आता खावटी देण्यात फार काही अर्थ राहिलेला नाही असे पंडित यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पंडित यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या – 

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Uddhav Thackeray | महाराष्ट्र कोरोनाच्या कठीण वळणावर उभा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Stop the purchase of Khawti scheme immediately Vivek Pandits letter to the Chief Minister)