सोलापुरात गोवर रुबेला लसीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप

सोलापूर: गोवर रुबेला लसीमुळे ऋषिकेश डोंबाळे या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यातच उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथं पाच चिमुकल्यांना लसीकरणानंतर उलटी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लसीकरणानंतर अशाप्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सध्या राज्यभरात 9 ते 15 वर्ष वयोगटातील शाळकरी …

सोलापुरात गोवर रुबेला लसीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप

सोलापूर: गोवर रुबेला लसीमुळे ऋषिकेश डोंबाळे या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यातच उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथं पाच चिमुकल्यांना लसीकरणानंतर उलटी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लसीकरणानंतर अशाप्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सध्या राज्यभरात 9 ते 15 वर्ष वयोगटातील शाळकरी मुलांना गोवर रुबेला  ही रोगप्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र ही लस दिल्यानंतर काही शाळकरी मुलांना त्रास होत आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील टी जी आमले प्रशालेतील  चार मुली आणि एका मुलाला लस दिल्यानंतर उलटी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तर डोणगाव येथील शंकरनगर तांड्यावरील दोन मुलींना ताप आल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लसीकरणानंतर काही धडधाकट मुलांनाही त्रास होत असल्याने, पालकांमध्ये घबराट आहे. तर सगळ्यात मोठी गोची होत आहे ती शिक्षकांची. एकीकडे सरकारी योजनांची अंलबजावणी करण्याचं ध्येय, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना वाढत असल्यामुळे शिक्षकांची द्विधा मनस्थिती आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *