SSC-HSC Exam : वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिवाजी पार्कवर आंदोलन

राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीने होतेय. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय.

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:16 PM, 2 Apr 2021
SSC-HSC Exam : वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिवाजी पार्कवर आंदोलन

मुंबई : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीने होतेय. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. याविरोधात मुंबईत शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी एल्गार केलाय. वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय (Student Protest against SSC HSC offline exam in Maharashtra amid Corona).

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केलाय. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेना भवनपासून जाण्यास सांगितले आहे. सध्या हे विद्यार्थी शिवाजी पार्कवर आंदोलन करत आहेत.

आंदोलनस्थळी 4 पोलीस गाड्या हजर

दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. पोलिसांच्या 4 गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्यात. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा :

Pune University : मुख्य परीक्षेपूर्वी ऑनलाईन सराव परीक्षा, गोंधळ टाळण्यासाठी पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; परीक्षा 10 दिवसांवर येऊन ठेपली तरी वेळापत्रक नाही

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत ‘अनलॉक की’ने गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनःस्ताप

व्हिडीओ पाहा :

Student Protest against SSC HSC offline exam in Maharashtra amid Corona