भूकंप साक्षरतेच्या नावाखाली जीवाशी खेळ, विद्यार्थ्यांना चक्क आगीतून चालण्याचं प्रशिक्षण

भूकंप साक्षरतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भूकंप साक्षरतेच्या नावाखाली जीवाशी खेळ, विद्यार्थ्यांना चक्क आगीतून चालण्याचं प्रशिक्षण

पालघर : भूकंप साक्षरतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Students walking through fire in Palghar). डहाणूतील आदिवासी शाळेत भूकंप साक्षरतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना चक्क आगीतून चालण्यास लावल्याचं समोर आलं आहे. धुंदलवाडी, चिंचणी या गावात ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या अजब प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप होत आहे.

भूकंप आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी याबाबतचं प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना थेट आगीतून चालायला लावलं. त्याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत लहान शाळकरी मुलं अक्षरशः आगीतून चालताना दिसत आहेत. यावेळी इतर मुलं टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. यात एक शिक्षक मुलांना आगीतून चालण्याच्या सूचना देतानाही दिसत आहेत.जे विद्यार्थी आगीतून चालत आले, त्यांचं या शिक्षकांनी कौतुक केलं.

पालघर आणि डहाणूमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. अशा घटनांमध्ये बचावासाठी संबंधित शाळेत मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरु होतं. मात्र, त्यासाठी थेट विद्यार्थ्यांना आगीतून चालायला लावण्याचा हा अजब प्रकार प्रशिक्षणाच्या नावाखाली घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
प्रशिक्षणाच्यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधातील कोणत्या बाबी तपासण्यात आल्या याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशा प्रशिक्षणात मुलांच्या जीवाला धोका होणार नाही, आगीने दुखापती होणार नाही याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याविषयी देखील कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Students walking through fire in Palghar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *