AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती, अचानक भलं मोठं होर्डिंग कोसळलं; नागरिकांमध्ये धावपळ

Kalyan Update : कल्याण पश्चिमेत अचानक भलं मोठं होर्डिंग कोसळलं; नागरिकांमध्ये धावपळ... घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती...

कल्याणमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती, अचानक भलं मोठं होर्डिंग कोसळलं; नागरिकांमध्ये धावपळ
| Updated on: Aug 02, 2024 | 12:19 PM
Share

घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती कल्याण याठिकाणी झाली आहे. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. होर्डिंगखाली 4 ते 5 गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. होर्डिंग पडल्याने 2 जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे…गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्यामुळे लोकांचे हाल झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. होर्डिंगचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी गोंधळ घाण्यास सुरुवात केली आहे. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण घडलेल्या घटनेमध्ये 4 ते 5 गाड्या अडकल्या असून 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ज्या चौकामध्ये होर्डिंग पडलं आहे, त्या चौकात नॅशनल रुग्णालय असल्यामुळे अधिक खळबळ माजली आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना यावर माहिती दिली आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची विचारपूस करण्यासाठी आलेल्या नातेवाईकाची गाडी देखील होर्डिंग खाली आल्याची माहिती मिळत आहे. ‘मी माझ्या कारमधून उतरलो आणि काही क्षणात होर्डिंग कोसळ्यामुळे माझा जीव थोडक्यात बचावला… माझ्या गाडीसोबत आणखी काही गाड्या होर्डिंग खाली अडकल्या आहेत…’ अशी माहिती नागरिकाने दिली आहे.

कल्याण होर्डिंग प्रकरणी मनसे आक्रमक

कल्याण होर्डिंग प्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.  सहजानंद चौकात  मनसेने ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत सगळ्यांना अधिकृत फोडणी काढणार नाही तोपर्यंत हालणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली आहे. पालिका आणि अग्निशामक दल मनसे कार्यकर्त्यांना बाजू होण्यासाठी विनंती करत आहेत.

घाटकोपर मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....