मुनगंटीवार 'सुपारी किलर', त्यांनी 'अवनी'ची हत्या केली : प्रीती मेनन

मुंबई : जवळपास 13 जणांचा जीव घेणाऱ्या यवतमाळमधील ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा खात्मा करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या वाघिणीच्या खात्म्यावरुन आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या असलेल्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी अवनीची हत्या केली”, असा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केली. …

मुनगंटीवार 'सुपारी किलर', त्यांनी 'अवनी'ची हत्या केली : प्रीती मेनन

मुंबई : जवळपास 13 जणांचा जीव घेणाऱ्या यवतमाळमधील ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा खात्मा करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या वाघिणीच्या खात्म्यावरुन आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या असलेल्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी अवनीची हत्या केली”, असा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केली. तसेच, मुनगंटीवार हे सुपारी किलर असल्याचा गंभीर आरोपही प्रीती शर्मा मेनन यांनी केला.

प्रीती शर्मा मेनन यांचा नेमका आरोप काय?

“सांगायला अत्यंत खेद वाटतोय की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवनी वाघिणीची हत्या केली. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी आपलं वचन पाळलं नाही. शिवाय, रिलायन्स किंवा इतर जण जंगलावर कब्जा करत असताना वाघांची काळजी कोण करतो?”, असे ट्वीट करत ‘आप’च्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

तसेच, प्रीती शर्मा मेनन यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘सुपारी किलर’ असे म्हटले आहे.

शार्प शूटर अजगर अलीचा अचूक नेम

‘T1’ या वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र वाघिणीने आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला केल्याने, शार्प शूटर अजगर अलीने नेम धरला आणि वाघिणीला अचूक टिपला. या झटापटीसह गेल्या 47 दिवसांपासून सुरु असलेला धरपकडीचा थरार थांबला. मध्यरात्री 1 च्या सुमारास ही चकमक झडली.

काल रात्री टी-1 वाघिणीचा शोध सुरु असताना ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केल्यानं शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला.

अवनीला वाचवण्यासाठी मोहीम

गेल्या जवळपास 47 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात होता. या वाघिणीचा अखेर खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, ‘T1’ वाघिणीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. ‘अवनी’ असे या नरभक्षक वाघिणीला नाव देत, तिच्यासाठी राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच अवनीला वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता.

दुसरीकडे, यवतमाळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत वावरणाऱ्या ग्रामस्थांनी वाघिणीच्या खात्म्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. फटाके फोडत, मिठाई वाटत आपला आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.

इटालियन श्वान ते गजराज… वाघिणीच्या खात्म्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

भारताचे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा हे सुद्धा त्यांचे प्रत्येकी 6 लाख किमतीचे केन कोर्स जातीचे दोन इटालियन श्वान घेऊन या भागात वाघीण जेरबंद करण्याच्या दृष्टीने दाखल झाले होते. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील कान्हा आणि महाराष्ट्रातील ताडोबामधून हत्तींनाही आणण्यात आले होते.

पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा, असे चार हत्ती मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातून आणण्यात आले होते. हे चारही हत्ती भाऊ होते. एखाद्या वाघाला घेरुन त्याला जेरबंद करण्यात हे चार हत्ती पटाईत मानले जायचे. मात्र वाघीण हाती लागण्याच्या आतच या चार हत्तींची घरवापसी करण्यात आली. या हत्तींच्या घरवापसीला कारण ताडोबातील गजराज ठरला. गजराज साखळी तोडून पळाला आणि परिसरात नासधूस केली. शिवाय यात महिलेचा जीव गेला होता. त्यामुळे गजराजसह इतर चारह हत्तींनाही परत पाठवण्यात आलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *