माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावितांच्या पीएचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : नंदूरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या बेपत्ता झालेल्या स्वीय सहायकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. भगवान गिरासे असे या स्वीय सहायकाचे नाव आहे. त्यांने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. गावित परिवार मुंबईला काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची भेट घ्यायला गेले असताना टिळक भवना समोरून स्वीय सहायक गिरासे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोध घेऊन त्यांना नंदूरबारमधील नवापूर …

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावितांच्या पीएचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : नंदूरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या बेपत्ता झालेल्या स्वीय सहायकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. भगवान गिरासे असे या स्वीय सहायकाचे नाव आहे. त्यांने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला.

गावित परिवार मुंबईला काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची भेट घ्यायला गेले असताना टिळक भवना समोरून स्वीय सहायक गिरासे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोध घेऊन त्यांना नंदूरबारमधील नवापूर येथे आणण्यात आले होते. मात्र, त्यांनी आज 11 वाजण्याच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नवापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले गिरासे गुजरातमध्ये सापडले होते. 2 दिवसांपूर्वी गिरासे मुंबईच्या टिळक भवनाजवळून बेपत्ता झाले होते. तेव्हापासूनच मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी गुजरातमध्ये त्यांचा शोध लागला. गिरासे ज्या अवस्थेत सापडले ते पाहता त्यांचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. गिरासे सापडले तेव्हा त्यांचे केस आणि मिशा कापलेल्या होत्या.

दरम्यान, पोलिसांनी गिरासेंना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले होते. पोलिसांच्या तपासात गिरासेंनी काहीही माहिती दिली नाही. ते बोलण्याच्याही अवस्थेत नव्हते. अपहरण करणाऱ्यांनी त्यांना गुंगीचे औषध दिल्याचेही बोलले गेले, त्यामुळेत ते गुंगीच्या अवस्थेत सापडल्याचे सांगितले गेले. त्यांच्या मानेवर इंजेक्शन दिल्याच्या खुणा आणि सूज आल्याचेही आढळून आले होते. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी ‘मी रेल्वेतून पडलो’ फक्त एवढेच बोलले होते.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *