बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे

अहमदनगर : “डॉ. सुजय विखेंचा विजय हा आनंददायी आहे.  मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो. पक्ष जर माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब टीव्ही 9 मराठीवर …

बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे

अहमदनगर : “डॉ. सुजय विखेंचा विजय हा आनंददायी आहे.  मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो. पक्ष जर माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब टीव्ही 9 मराठीवर संवाद साधला.

माझ्या वडिलांना उघडपणे प्रचारही करता आला नाही, पण आतून आम्ही काय करु शकतो हे दाखवून दिलं. वडिलांशिवाय ही निवडणूक लढणं शक्य नव्हतं, असं यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “डॉ. सुजयचा विजय हा माझ्यासाठी आनंदाची घटना आहे. त्याने केलेली प्रचंड मेहनत, तीन वर्ष केलेलं काम, त्याने जनमाणसात निर्माण केलेलं स्थान यामुळेच आमच्या पक्षाकडे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होतो. दुर्दैवाने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीकडून जी विधानं केली गेली, त्यावरुन व्यक्ती द्वेष दिसून आला. नंतर सुजयने त्यांचा निर्णय केला. मला मुख्यमंत्री फडणवीसांना धन्यवाद द्यायचं आहे, त्यांनी विश्वासाने सुजयला सामावून घेतलं. विश्वास सार्थ ठरवण्याचं काम सुजय विखेंनी दाखवला. प्रचारात खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका केली. पक्षासाठी सभागृहात, सभागृहाबाहेर जी काही मेहनत घेतली, तरीसुद्धा पक्षानेच आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्षच जर आपल्यामागे उभं राहू शकत नाही, त्यामुळे मुलामागे उभं राहणं कर्तव्य होतं”.

माझे वडील बाळासाहेब विखेंची अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका होती. ते सत्तेसाठी भांडले नाहीत, लोकांसाठी संघर्ष केला. तोच वारसा सुजय चालवतोय, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

शरद पवारांबद्दल प्रतिक्रिया

यावेळी राधाकृष्ण विखेंना शरद पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात आली. पवार म्हणाले होते मी माझ्या नातवाची काळजी करेन इतरांच्या नातवाची का करु, त्याबाबत विचारलं असता, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मला पवारसाहेबांबद्दल आदर आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यावेळी समजूतदारपणा दाखवायला हवं होतं. मी पवार साहेबांना जाहीर आवाहन केलं होतं, नातू समजून आशीर्वाद द्या असं म्हटलं होतं. पण राजकारणात काही घटना घडत राहतात. पार्थचा पराभव झाला त्याबद्दल मी भाष्य करणार नाही. परमेश्वराच्या घरात न्याय आहेच. जनतेच्या मनात जे असतं तेच होतं. त्यांची कितीही इच्छा असली, तरी नगरच्या लोकांनी सुजयला आशीर्वाद दिला. मतदानातून आणि विजयाने त्यांना दिलेलं हे उत्तर आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

VIDEO:

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *