सुजय विखेंचा अर्ज मागेच राहिला, गोंधळानंतर गाडीत अर्ज भरला, कर्डिलेही हजर

अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ झाल्याचा प्रकार घडला. अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी अखेर कार्यालयाच्या बाहेर गाडीवरच उमेदवारी अर्ज भरला. सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज …

सुजय विखेंचा अर्ज मागेच राहिला, गोंधळानंतर गाडीत अर्ज भरला, कर्डिलेही हजर

अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ झाल्याचा प्रकार घडला. अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी अखेर कार्यालयाच्या बाहेर गाडीवरच उमेदवारी अर्ज भरला. सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे.

सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, पशुसंर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अभय आगरकर, शिवसेना, भाजपसह सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे दिलीप गांधी यावेळी उपस्थित राहणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष होते, मात्र त्यांच्या उपस्थितीने भाजपने पक्षांतर्गत ऐक्य दाखवून दिले आहे. यावेळी सुजय विखेंनी दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडी दोघांनीही या मतदारसंघात आपली ताकद लावली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची पाहायला मिळणार आहे.

आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, सुजय विखे भावूक

डॉ. सुजय विखे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी बोलताना विखे भावूक झाले. तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आईवडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आईवडील आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *