सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

राष्ट्रवादीच्या कार्येकर्ता मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय.

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 20:38 PM, 16 Jan 2021
सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादेत सुप्रिया सुळेंनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला असून, तिथे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्येकर्ता मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय. खासदार सुप्रिया सुळेंसोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. (Supriya Sule Event Flurry Of Social Distance)

सुप्रिया सुळेंनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते, जर ज्यांनी मास्क घातलेले होते, त्यांचेसुद्धा मास्क तोंडावरून खाली आले होते. सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे.

सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी

सुप्रिया सुळे या औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता. मात्र या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जे काही कोरोनाचे नियम घालून दिलेले आहेत. ते पूर्णतः धाब्यावर बसवल्याचं दिसून आले. कार्यकर्त्यांनी मास्क वापरलेले नव्हते, सॅनिटायझर सोबत ठेवलेले नव्हते. सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झालीय. राज्य शासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत. कोरोनाचे नियम पाळा आणि नियमांचे कोणीही भंग करू नका, असं शासनाकडून सांगितलं जातंय. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी कोणतेही नियम पाळलेले दिसत नाहीत.

खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झाला: सुप्रिया सुळे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच प्रकरणात सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी विश्वासाने पोलिसांवर टाकूया, ते जे काही चौकशी करतील,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झालाय. काहीही समजेनासं झालंय. विषय अतिशय संवेदनशील आहे. कोणताही आरोप जेव्हा त्या कुटुंबावर होतो, त्या कुटुंबात इतरही लोक असतात. भारतातील कुटुंब म्हणजे कपल्स नव्हे. ती फॅमिली कशातून जाते याचा आपण दोन्ही बाजूंनी सर्वांनी विचार करायला हवा,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Dhananjay Munde Case | पोलिसांवर विश्वास, मुंडे प्रकरणाची ते योग्य चौकशी करतील : सुप्रिया सुळे

सुप्रीम कोर्टाचे आभार, आतातरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा : सुप्रिया सुळे

Supriya Sule Event Flurry Of Social Distance