माझा घात-अपघात होऊ शकतो, सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट

चंद्रपुरात एका व्याख्यानात बोलत असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

माझा घात-अपघात होऊ शकतो, सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 10:18 AM

निलेश डाहाट, Tv9 मराठी, चंद्रपूर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. चंद्रपुरात बोलत असताना, माझा घात-अपघात होऊ शकतो अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. ‘तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने अपघात घडविला जाऊ शकतो, अशी अधिकाऱ्यांकडून माहिती आपल्याला मिळाल्याचं  सांगत सुषमा अंधारे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देतांना त्यांनी हे वक्तव्य केलंय. महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत याप व्याख्यानाचे आयोजन केले होते. सुषमा अंधारे या सध्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड महिला नेत्या मानल्या जातात.

सुषमा अंधारे यांनी भाजपा, मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांना नेहमीच आपल्या भाषणातून निशाण्यावर ठेवलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सुषमा अंधारे यांनी प्रखर टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या जुन्या भाषणांमधून हिंदू-देव देवतांवरही टीका केल्याचा त्यांच्यावर आरोप भाजपाने यापूर्वीच केला आहे. तसेच वारकरी संप्रदायाचा सुषमा अंधारे यांनी अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप काही वारकरी संप्रदायातील मंडळींनी देखील केला आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....