स्वाभिमान पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

सिंधुदुर्ग : कोकणाच्या राजकीय नकाशावरील संवेदनशील केंद्र असलेल्या कणकवलीमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कणकवलीत तुफान हाणामारी झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि भाजपचे युवा नेते संदेश पारकर समर्थक यांच्या गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी आणि मोडतोडीत झालं. कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास …

स्वाभिमान पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

सिंधुदुर्ग : कोकणाच्या राजकीय नकाशावरील संवेदनशील केंद्र असलेल्या कणकवलीमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कणकवलीत तुफान हाणामारी झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि भाजपचे युवा नेते संदेश पारकर समर्थक यांच्या गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी आणि मोडतोडीत झालं. कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना प्रसाद दिला. या प्रकरणामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. यात पारकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या दोन दुचाकींचंही नुकसान झालं. शिवाय काहींना मारहाणही करण्यात आली.
पोलीस बंदोबस्त आल्यानंतर हाणामारी थांबली. मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नगरपंचायत निवडणुकीत एका उमेदवाराचं काम केल्यावरून गेले काही दिवस अंतर्गत वादंग सुरू होता. नगराध्यक्षांना आज अपशब्द उच्चारल्यावरून वादंगाचं पर्यावसान हाणामारीत झालं. या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरू होती.
मारहाणीमागे पारकर गटाचा हात : नगराध्यक्ष समीर नलावडे
पारकर गटाच्या 20 ते 25 जणांनी आमच्या दोन कार्यकर्त्यांना कॉलेज आवारात लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *