ताडोबातील वाघ भटकंती करत गोदिंयातील वनक्षेत्रात, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत

मात्र या अल्लादीन नामक वाघाबद्दल गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहेत.  त्याबाबत अजून ही पुष्टी न झाल्याची माहिती वन विभाग देत आहे.

ताडोबातील वाघ भटकंती करत गोदिंयातील वनक्षेत्रात, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत
tiger (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 2:46 PM

गोंदिया : ताडोबातील अल्लादिन नावाचा वाघ भटकंती करत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. या वाघाचे गोरेगाव तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात नागरिकांना दर्शन झाले होते, असा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. अल्लादिन वाघ या परिसरात वास्तव्यास असलेल्या वृत्ताला दुजोरा जात आहे. तर याच अल्लादीनने दोन शेतकऱ्यांच्या नरडीचासुद्धा घोट घेतला असल्याची माहिती मिळत आहे. (Tadoba Tiger Wandering In the forest area of Gondia farmers panic)

मात्र या अल्लादीन नामक वाघाबद्दल गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहेत.  त्याबाबत अजून ही पुष्टी न झाल्याची माहिती वन विभाग देत आहे. मात्र अल्लादीन नामक वाघाची नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

अल्लादिन वाघ गायब

नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आणि नागझिरा अभयारण्य गोरेगाव वन परिक्षेत्राला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. मागील तीन- चार दिवसांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेला अल्लादिन नामक वाघ या प्रकल्पातून गायब झाल्याची चर्चा होती. यानंतर वन्यजीव विभागाने ट्रॅकरच्या मदतीने या वाघाचा शोध सुरू केला होता. त्यानंतर हा वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात दाखल झाल्याची माहिती होती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती गोंदिया वन आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

वाघांची संख्या सातवर

त्यामुळे या दोन्ही विभागांच्या चमूने शोध कार्य सुरू केले होते. दरम्यान, हा वाघ तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. वन आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघाचे दर्शनसुद्धा झाल्याची माहिती आहे. गोरेगाव वन परिक्षेत्रात पूर्वीच 6 वाघ वास्तव्यास होते. त्यातच आता ताडोबातील अल्लादिन वाघाची भर पडल्याने या परिसरातील वाघांची एकूण संख्या आता 7 वर पोहोचली आहे. ताडोबातील अल्लादिन नामक वाघ गोरेगाव वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याचे बोललं जात आहे.

गोरेगाव वनविभाग कमालीची गुप्तता

त्यामुळे अनेक वन्यजीवप्रेमींचा या वाघाला पाहण्याचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकड़े मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाने तीन- चार जणांवर हल्ला केला आहे. यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मात्र गोरेगाव वनविभाग कमालीची गुप्तता पाळत आहे. दरम्यान “अल्लादीन नावाच्या वाघाची” अजून ही पुष्टी न झाल्याची माहिती वन विभाग देत आहे.

(Tadoba Tiger Wandering In the forest area of Gondia farmers panic)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक मदत मिळावी म्हणून लोक कलावंतांकडून शासनाला साकडे!

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील साडेचार हजार हेक्टर शेतीचे नुकसान; पंचनाम्याचे आदेश

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.