सीरममधील आग आटोक्यात आणण्यास तातडीने उपाययोजना राबवा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत करा: उद्धव ठाकरे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:25 PM, 21 Jan 2021
सीरममधील आग आटोक्यात आणण्यास तातडीने उपाययोजना राबवा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईः पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत आणि अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिलेत. (Take Immediate measures to control the fire in the serum; Orders of the Chief Minister and Deputy Chief Minister)

सीरमच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली आणि तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्यः अजित पवार
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्यासाठी मदतकार्य राबवत आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातील माहिती घेतली असून, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आलेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा

कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी, ‘ही’ लस ठरणार रामबाण?

Take Immediate measures to control the fire in the serum; Orders of the Chief Minister and Deputy Chief Minister