शिवरायांच्या घोषणा दिल्याने बेळगावात विद्यार्थ्याला मारहाण

बेळगाव : बेळगावात पुन्हा एकदा कर्नाटक्यांची दादागिरी पाहायला मिळाली. मात्र, यावेळी दादागिरी कुणा कार्यकर्त्याने केली नाही, तर चक्क एका शिक्षकाने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेळगावात शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. नेमका प्रकार काय घडला? बेळगावातील शाळेत बालदिनानिमित्त कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पोवाड्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा …

शिवरायांच्या घोषणा दिल्याने बेळगावात विद्यार्थ्याला मारहाण

बेळगाव : बेळगावात पुन्हा एकदा कर्नाटक्यांची दादागिरी पाहायला मिळाली. मात्र, यावेळी दादागिरी कुणा कार्यकर्त्याने केली नाही, तर चक्क एका शिक्षकाने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेळगावात शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

बेळगावातील शाळेत बालदिनानिमित्त कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पोवाड्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा एका विद्यार्थ्याने दिल्या. त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

या संतापजनक प्रकाराची माहिती युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकाला चांगलंच धारेवर धरलं.

दरम्यान, कर्नाटक सरकार व कानडी संघटना विविध कारणांनी मराठी भाषिकांना त्रास देत असतानाच, बालदिनाच्या कार्यक्रमावेळी अशी घटना घडल्याने मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *