Thackeray Brand: ठाकरे ब्रँड सुरू झाल्यावर बघा काय होतंय… उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच सूचक इशारा
शिवसेना भवनात आज बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ठाकरे ब्रँडबाबत भाष्य केले. ठाकरे ब्रँडची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होतं ते असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना भवनात आज बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ठाकरे ब्रँडबाबत भाष्य केले. ठाकरे ब्रँडची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होतं ते असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लोकांनी आपापली काम सांगितलं. गौरीशंकर यांना बाजूला घेऊन मी विचारलं. तुमची काम करण्याची जिद्द आणि निष्ठा महत्वाची. आलेल्या वादळाला तुम्ही उतर दिल आहे. बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही पण बेस्टच काय होईल याची काळजी आहे. गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे सर्वाना कळलं. कागदावर सत्ता कोणाची असली तरी वट कोणाची आहे हे सर्वांना कळलं.’
मला बेस्टची चिंता आहे – ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बेस्टची चिंता मला आहे. जे आपले कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यांची जागा कंत्राटी कामगार घेत आहेत. नेहमी तुम्हाला चिंताग्रस्त ठेवतायत उद्या काय यावर ठेवतायत, लटकती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवतायत. काल परवा झालेला पराभव याची कारण काहीही असतील, पराभवातून खचणारा मी नाहीहे, त्यातून विजयी मिळवणारा मी आहे. मत चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे, तुम्हाला हरवायच तर हरवा पण मत चोरी करायची, मला सर्वच पाहिजे असं त्यांची वृत्ती आहे. भस्म्या रोग झाला आहे. मला चिंता मुंबईवरच्या मराठी ठस्याची आहे.’
मी बेस्टने प्रवास केलेला आहे
उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘बेस्ट अडाणीच्या हातात देतील, एअरपोर्ट दिल मोनो अनिल अंबानीकडे दिलंय. बेस्ट ही माझ्या शहराची रक्त वाहिनी आहे. मी स्वतः बेस्टने प्रवास केला आहे, शाळेत असताना कॉलेजला जाताना प्रवास केला आहे. तुंबलेल्या पाण्यातून बेस्ट कशी काढली हे मी पाहिलं आहे. मी मुख्यमंत्री असताना दोन तीन डेपोचं नूतनीकरण केलं. चांगलं काम केल पगार दिला, बोनस देण्याची परिस्थिती आहे कि नाही माहिती नाही, सरकार यांचं आहे, पण लोकांना द्यायला पैसा नाही.’
ठाकरे ब्रँडची सुरवात झाल्यावर बघा काय होतं ते…
मुंबई महाराष्ट्राने मिळवली पण मराठी माणसाला स्थान नव्हतं पण शिवसेनेने हक्क मिळवून दिले. बेस्टच्या पॅनलमध्ये आम्हाला का मतदान दिल नाही हे एकमेकांमध्ये बोला, एकमेकांना विचारा. दाखवल काय गेलं ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँडची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होत. आपल्या राज्यातील मराठी हिंदूसाठी आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला लढायची काय खाज आहे. बेस्टचं खाजगीकरण करू देऊ नका. ते करायचं असत तर आपण कधीच करायला दिल असत पण करू द्यायचं नाही.
