ठाण्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याचा भाजपचा आरोप, सर्वांना बेड उपलब्ध, पालिकेचा दावा

ठाणे शहरात महापालिका स्तरावर उपाय योजना सुरु असून खाजगी आणि शासकीय रुग्णायात खाटांची संख्या पाहता रुग्णाला योग्य उपचार मिळत असल्याचे पालिकेचे उपायुक संदीप माळवी यांनी सांगितले.

ठाण्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याचा भाजपचा आरोप, सर्वांना बेड उपलब्ध, पालिकेचा दावा
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 7:57 PM

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पालिका रुग्णालय आणि खाजगी (Thane BJP Vs Municipal Corporation) रुग्णालयात कोरोना रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत भाजप गट नेते नारायण पवार यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तर, दुसरीकडे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सर्व रुग्णांना खाटा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.

ठाणे शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 827 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 779 पर्यंत पोहचली आहे. तर आतापर्यंत 263 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्यांची संख्या 3,785 पर्यंत पोहोचली आहे.

ठाणे शहरात महापालिका स्तरावर उपाय योजना सुरु असून खाजगी आणि शासकीय रुग्णायात खाटांची संख्या पाहता रुग्णाला योग्य उपचार मिळत असल्याचे पालिकेचे उपायुक संदीप माळवी यांनी सांगितले.

दुसरीकडे, नॉन ICU मध्ये 1 हजार 406 खाटा आहेत. तर ICU मध्ये 252 खाटा आहेत. तसेच, न्यू होराईझन शाळेत एक हजार खाटा असून नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात 1024 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, काही खाजगी हॉटेल देखील लक्षणं नसलेल्या लोकांच्या क्वारंटाईनसाठी देण्यात आलेले आहे, असे पालिकेचे उपायुक संदीप माळवी यांनी सांगितले आहे (Thane BJP Vs Municipal Corporation).

भाजप गट नेते नारायण पवार यांनी याबाबत आक्षेप घेतला असून ठाणे महापालिका स्तरावर खाटांची संख्या कमी असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, खाजगी रुग्णालय रुग्णांची लूट करत आसल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे.

कल्याणमध्ये पीपीई किटचे तीन दिवसाचे बिल 27 हजार

कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. दुसरीकडे, अन्य आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसत आहे. काही ठिकाणी अन्य आजाराच्या रुग्णांना रुग्णालयं उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत. दाखल करुन घेतलेच तर त्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळले जात आहे. असाच एक प्रकार कल्याण पुर्वेतील एका खाजगी रुग्णालयात समोर आला आहे.

या रुग्णालयात एक व्यक्ती तीन दिवस उपचार घेत होता. या व्यक्तिवर करण्यात आलेल्या उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले, तेव्हा त्यात तीन दिवसात पीपीई किटचे 27 हजार रुपये आकारले. ही धक्काबाब शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समोर येताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले.

Thane BJP Vs Municipal Corporation

संबंधित बातम्या :

लातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष

IAS Transfer | ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.