भाजप-मनसे आमदारांची एकत्रित सायकलिंग, केडीएमसी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित येणार?

केडीएमीसीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे केडीएमसीमधील भाजप मनसेचे आमदार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जवळ येताना दिसत आहेत.

भाजप-मनसे आमदारांची एकत्रित सायकलिंग, केडीएमसी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित येणार?


ठाणे : सध्या कल्याण डोंबिवलीत भाजप-मनसे युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. केडीएमीसीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे केडीएमसीमधील भाजप मनसेचे आमदार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळेच मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही कार्यक्रमात एकत्र येतो, निवडणुकीच्या वेळचं तेव्हाच्या तेव्हा बघू असं उत्तर देत वेळ मारुन नेलीय (BJP and MNS MLA in common program in Kalyan Dombivali speculations of alliance).

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांच्या प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर एका जिमच्या उद्घाटनानिमित्त मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं.

दोघांनीही जिम उद्घाटनाच्या कार्यक्रमात जिममधील सायकल चालवण्याचा आनंद घेत फिट राहण्याचं आवाहन केलं. भाजप आणि मनसेचे आमदार ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित आल्याने युतीच्या जोरदार चर्चा झाल्या. यापूर्वी काही कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही आमदार एकत्रित आले होते. त्यामुळे भाजप मनसे एकत्रित येणार का? या चर्चेला पुन्हा बळ मिळालं आहे. यावर आमदार राजू पाटील यांनी “आम्ही खासगी कार्यक्रमांना नेहमी एकत्रित येतो. निवडणुकीचं जेव्हाचं तेव्हा बघू”, असं बोलून वेळ मारुन नेली.

हेही वाचा :

कल्याण डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी राज ठाकरेंची ‘त्रिमूर्ती’

‘एक आहे पण नेक आहे’, आमदार राजू पाटलांच्या समर्थनार्थ बाळा नांदगावकर यांची बेधडक फेसबुक पोस्ट

पक्षातून जेवढी लोक गेली त्यांनी स्वतःला विकलं; मनोज घरत यांची पक्षांतर करणाऱ्यांवर सडकून टीका

व्हिडीओ पाहा :

BJP and MNS MLA in common program in Kalyan Dombivali speculations of alliance

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI