बाळासाहेब असते तर त्यांनी खपवून घेतलं नसतं, शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन भाजपचा शिवसेनेला टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हे खपवून घेतले गेलं नसतं असे भाजपचे आमदार निरंजन डावखरे म्हणाले. ( Niranjan Davkhare Shiv Sena Shiv Jayanti issue)

बाळासाहेब असते तर त्यांनी खपवून घेतलं नसतं, शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन भाजपचा शिवसेनेला टोला
निरंजन डावखरे
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:43 PM

ठाणे : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हे खपवून घेतले गेलं नसतं. त्यांनी शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी केली असती,” असा टोला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी शिवसेनेला लगावला. शिवजयंतीच्या मुहूर्तावर 40 x 30 फुटांचे भव्य पोट्रेट काढण्यात आले आहे. या कलाकृतीला पाहण्यासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे ठाण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. (BJP MLA Niranjan Davkhare criticizes Shiv Sena on Shiv Jayanti issue)

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर त्यांनी हे खपवून घेतले गेलं नसतं. त्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली असती. परंतु महाविकास आघाडीच्या तीन चाकी सरकारमध्ये शिवसेनेवर बंधने आहेत. शिवसेनेची ही दुर्बलता आहे,” असे डावखरे म्हणाले.

हे फक्त महाविकास आघाडी सरकारमध्येच होऊ शकतं

यावेळी पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ”आपण बघतोय की गुन्हेगांराच्या मिरवणुका निघत आहेत. कारागृहातून सुटले की त्यांची मिरवणूक निघते आहे. पण छत्रपती शिवजी महाराज यांच्या जयंतीवर बंदी घातली जात आहे. असे फक्त महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच होऊ शकते,” असे निरंजन डावखरे म्हणाले.

40 x 30 फुटांचे भव्य पोट्रेट

दरम्यान ठाण्यात पन्नास हजार पणत्यांच्या मदतीने शिवाजी महाराज यांचे . 40 x 30 फुटांचे भव्य असे पोट्रेट साकारण्यात आले आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला. ठाण्यातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. चेतन राऊत या आर्टिस्टने 10 जणांच्या टिमसोबत ते साकारले आहे. या कलाकृतीला पाहण्यासाठी येण्याचे आवाहनही निरंजन डावखरे यांनी केले.

इतर बातम्या :

Video | Maharashtra weather forecast : हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा, राज्यभरात पाऊस बरसला, संततधार कायम राहणार

‘शशिकांत शिंदे आणि मी एकच’, जावळीच्या सरपंच परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंची पुन्हा फटकेबाजी

Bharat Bandh: मोठी बातमी! देशभरात ‘या’ दिवशी सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहणार; CAIT ची माहिती

(BJP MLA Niranjan Davkhare criticizes Shiv Sena on Shiv Jayanti issue)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.