Devendra Fadnavis : ठाण्यातील घराघरांवर तिरंगा फडकवा; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतीय ध्वजसंहितनुसार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावावा.

Devendra Fadnavis : ठाण्यातील घराघरांवर तिरंगा फडकवा; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
ठाण्यातील घराघरांवर तिरंगा फडकवा; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:35 PM

ठाणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता व अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा (tiranga) ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे केले. ठाणे शहर भाजपाच्या (bjp) वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील विविध भागात रॅलींबरोबरच मान्यवर व्यक्तींकडे तिरंगा मानाने सुपूर्द केला जात आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सवानिमित्ताने `हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला आहे. या रथाचे व तिरंगा रॅलीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते संजय वाघुले, मनोहर डुंबरे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार अमृत महोत्सवात घरोघरी तिरंगा फडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तिरंगा हा अस्मिता व अभिमानाचे प्रतिक आहे. देशाचा सैनिक हा तिरंगा फडकविण्यासाठी लढतो. मात्र, हरलो तर तिरंग्यात देह लपेटला जाईल, अशी सैनिकाची भावना असते. त्या राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा मानसन्मान वाढविण्यासाठी, ठाण्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवावा. त्याचबरोबर अमृत महोत्सवानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाही महाराष्ट्र व बलशाही राष्ट्र घडविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हे सुद्धा वाचा

राबोडीत भव्य तिरंगा रॅली

दरम्यान, भाजपा ठाणे शहराच्या वतीने `हर घर तिरंगा’ अभियानानिमित्ताने मंडलनिहाय प्रभातफेरी, तिरंगा रॅलीसह डॉक्टर व मान्यवर व्यक्तींना तिरंगा सन्मानाने प्रदान करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कोपरी व राबोडी येथे भव्य रॅली काढून तिरंगा फडकविला गेला. या अभियानाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या विविध भागात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात देशभक्तीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी श्री. बाप्पा राऊत दूरध्वनी क्रमांक 7506231777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेचे अभियान

दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना तिरंगा सहज उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या तिरंगा विक्री केंद्रास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वतः तिरंगा खरेदी करून नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करा

13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतीय ध्वजसंहितनुसार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावावा. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये, ध्वज कोणत्याही इतर ध्वजासोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर इतर ध्वजासोबत फडकवू नये. ध्वज मोकळ्या जागेत किंवा घरावर लावायचा असल्यास तो दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत दिवस रात्र फडकविता येईल. तसेच या कालावधीत राष्ट्रध्वज काळजीपूर्वक जतन करावा. तरी नागरिकांनी ध्वज खरेदी करुन ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.