ठाण्यात गोडाऊनला आग, साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण

ठाण्यातील मानपाडा परिसरातील कोठारी वेअरहाऊसमधील दोन गोडाऊनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत फारसं नकुसान झाले नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

ठाण्यात गोडाऊनला आग, साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:34 AM

ठाणे :  ठाण्यातील (Thane) मानपाडा परिसरातील कोठारी वेअरहाऊसमधील दोन गोडाऊनला आग (Fire) लागल्याची घटना घडली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी, अपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्नशमन दलाचे (Fire brigade) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने या आगेवर सकाळी साडेसहाच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ज्या गोडाऊनला आग लागली त्या गोडाऊन शेजारीच  प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि यमाहा बाईकचे शोरुम देखील होते. या आगीत प्रियंक ट्रेडिंग कंपनीचे तसेच यमाहा बाईक शोरूममधील काही साहित्य जळून नुकसान झाले आहे.

साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण

कोठारी वेअरहाऊसमधील दोन गोडाऊनला आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागली होती. आगीची घटना समजताच महावितरणचे कर्मचारी, अपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्नशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने या आगेवर सकाळी साडेसहाच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात आले. तब्बल साडेतीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. आग वेळीच अटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले आहे.  या गोडाऊनच्या शेजारीच प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि यमाहा बाईकचे शोरुम देखील होते. आग नियंत्रणाबाहेर गेली असतील तर मोठे नुकसान झाले असते.

हे सुद्धा वाचा

आगीत कोणतिही जीवितहानी नाही

दरम्यान पहाटेच्या सुमारास ही आग लागली. अग्नशमनदलाकडून घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या आगीत मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. ज्या गोडाऊनला आग लागली त्या गोडाऊन शेजारीच  प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि यमाहा बाईकचे शोरुम देखील होते. या आगीत प्रियंक ट्रेडिंग कंपनीचे तसेच यमाहा बाईक शोरूममधील काही साहित्य जळून नुकसान झाले आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.