Snake In Jail: साप जेलमध्ये; अंबरनाथ पोलिस ठाण्यात घडला विचित्र प्रकार; पाहा व्हिडिओ

कल्याण: अंबरनाथमध्ये(Ambernath) चक्क पोलिसांच्या लॉकअपमध्ये(police lockup) साप(snake) घुसल्याच्या प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. सापाला पाहून पोलिसांची तारांबळ उडाली, मात्र सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी या सापाला सुरक्षितपणे लॉकअपमधून बाहेर काढलं.पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सापांच्या बिळांमध्ये पाणी गेल्यानं साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीत घुसण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशावेळी नागरिकांनीही सतर्क राहण्याची आवश्यकता […]

Snake In Jail: साप जेलमध्ये; अंबरनाथ पोलिस ठाण्यात घडला विचित्र प्रकार; पाहा व्हिडिओ
वनिता कांबळे

|

Jul 02, 2022 | 8:51 PM

कल्याण: अंबरनाथमध्ये(Ambernath) चक्क पोलिसांच्या लॉकअपमध्ये(police lockup) साप(snake) घुसल्याच्या प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. सापाला पाहून पोलिसांची तारांबळ उडाली, मात्र सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी या सापाला सुरक्षितपणे लॉकअपमधून बाहेर काढलं.पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सापांच्या बिळांमध्ये पाणी गेल्यानं साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीत घुसण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशावेळी नागरिकांनीही सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी सांगितलं.

अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला. कारण पोलीस ठाण्याच्या महिला लॉकअपमध्ये एक काळ्या रंगाचा साप घुसल्याच ड्युटीवरील पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी लॉकअपमध्ये कुणीही आरोपी नसले, तरी या सापाला पाहून मोठमोठ्या आरोपींना सहज पकडणारे पोलीस देखील क्षणभर स्तब्ध झाले.

हा साप नेमका कोणता आहे? तो विषारी आहे की बिनविषारी? हे काहीच माहित नसल्यानं पोलिसांनी थेट सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना पाचारण केलं. अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात उडालेला हा गोंधळ पाहून गोहिल यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत या सापाला पकडलं. यानंतर हा साप दहिवडी जातीचा असून तो बिनविषारी असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहाण्या माणसानं पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असं म्हणतात, पण या सापाने मात्र पोलीस ठाण्याचाच नव्हे तर लॉकअपचाही पाहुणचार घेतला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडीझुडपं असून पाऊस सुरु झाल्यानं सापाच्या बिळात पाणी गेलं असावं आणि त्यामुळं सुरक्षित जागेच्या शोधात तो इथं आला असावा, असा अंदाज यानंतर व्यक्त करण्यात आला.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें