Jitendra Awhad : आपण भींत बांधणार होतो त्याचे काय झाले? मंत्री आव्हाडांचा मुख्यमंत्री आणि थोरातांना थेट ट्विटरवरच सवाल

खारीगावमधील एका भूखंडाच्या संरक्षणासाठी भिंत न बांधल्याने आव्हाड यांनी सावल करायला थेट ट्विटर निवडलं आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात काय निर्णय घेणार? आणि या बेधडक ट्विटने महाविकास आघाडीतील समन्वय बिगडणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Jitendra Awhad : आपण भींत बांधणार होतो त्याचे काय झाले? मंत्री आव्हाडांचा मुख्यमंत्री आणि थोरातांना थेट ट्विटरवरच सवाल
आपण भींत बांधणार होतो त्याचे काय झाले? मंत्री आव्हाडांचा मुख्यमंत्री आणि थोरातांना थेट ट्विटरवरच सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:08 PM

ठाणे : आज राज्यातलं वातावरण राज ठाकरेंच्या सभेने जरी तापलं असलं तरी अशात सरकारमधील एका मंत्र्यांचे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या ट्विटने महाविकास आघाडीतीन मतभेद किंवा समन्वय नसल्याची टीका खरी ठरतेय का? असा सवालही उपस्थित झाला आहे. तसं तर असे मतभेद आणि समन्वयाचा मुद्दा बाहेर येणे ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र आता थेट एका कॅबिनेट मंत्र्यानेच (Jitendra Awhad) थेट ट्विटरवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टॅग करत काही सवाल केले आहे. खारीगावमधील एका भूखंडाच्या संरक्षणासाठी भिंत न बांधल्याने आव्हाड यांनी सावल करायला थेट ट्विटर निवडलं आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात काय निर्णय घेणार? आणि या बेधडक ट्विटने महाविकास आघाडीतील समन्वय बिगडणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्या ट्विटची चर्चा होतेय. ते ट्विटही पाहूयात…

आव्हाडांची लागोपाठ ट्विट

ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, “मी सातत्याने खारीगांव मधील 72 एकर खारलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीचे रक्षण करा असे त्यावेळेस पासूनच्या जिल्हाधिका-यांना मी सांगत आलो. शासनाची जेवढी जमीन आहे ती सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून त्याच्या चहू बाजूला सीमा बघून 8 फुटाची भिंत बांधून घ्या असे सांगितले. आता काही खाजगी विकासक ह्यातल्या जागांवर मालकी सांगत आहेत.. हे कसे शक्य आहे भरणी करता आहेत आपण भिंत बांधणार होतो त्याचे काय झाले मी तिथला लोक प्रतिनिधी म्हणून स्पष्ट पणा ने सांगतो एक इंच हि कुणाला खाऊ देणार नाही.” असा आशयाची लागोपाठ ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आली आहेत.

ट्विटमुळे वाद वाढणार?

राज्याच्या राजकारणा विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद अनेकदा बाहेर आले आहेत. तरीही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाने सरकार चालवत आहे. मात्र थेट राष्ट्रवदीच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनेच काँग्रेस आणि शिवसेनेला हा सवाल केल्याने, हा वाद आणखी वाढणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.