कल्याण रेल्वे पोलिसांची चमकदार कामगिरी, एका महिन्यात 1 कोटींचे 350 मोबाईल नागरिकांना परत

यामध्ये हरविलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल, फटका मारुन लुटलेले मोबाईल यांचा समावेश आहे. (Kalyan Railway Police Return 350 Mobile)

कल्याण रेल्वे पोलिसांची चमकदार कामगिरी, एका महिन्यात 1 कोटींचे 350 मोबाईल नागरिकांना परत
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 2:47 PM

कल्याण : लोकलने प्रवास करताना जर तुमची एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली, तर ती परत मिळेल याची काही खात्री नसते. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी गेल्या महिन्याभरातील चोरीला गेलेले किंवा हरवलेले जवळपास 350 मोबाईल परत केले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत जवळपास 1 कोटी रुपयांच्या आसपास आहे. (Kalyan Railway Police Return 350 Mobile)

कल्याण रेल्वे पोलिस अंतर्गत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर असा 84 किलोमीटरचा भाग येतो. या दरम्यान लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. लॉकडाऊनपूर्वी आणि अनलॉकमध्ये काम सुरु करण्यात आले. मात्र या दरम्यान नागरिकांच्या वस्तू मोठ्या प्रमाणात हरवल्या, तर काहींच्या वस्तू चोरीला गेल्या. यानंतर कल्याण जीआरपीने वस्तू परत करण्याचे काम केले.

यानुसार कल्याण जीआरपी पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात जवळपास एक कोटीचे ३५० मोबाईल परत केले आहेत. यामध्ये हरविलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल, फटका मारुन लुटलेले मोबाईल यांचा समावेश आहे.

दरम्यान यातील काही मोबाईल हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयाद्वारे नागरिकांना ते परत मिळणार आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांना मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे.

यासंदर्भात कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मिक शार्दुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात 350 मोबाईल परत केले आहेत. यातील काहींचे पत्ते शोधून त्यांना घरी जात चोरीला किंवा हरविलेल्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. तर काहींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या वस्तू परत केल्या आहेत.

वर्षभरात चोरी आणि हरविलेल्या 1700 वस्तू परत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीविषयी समधान व्यक्त केले आहे. (Kalyan Railway Police Return 350 Mobile)

संबंधित बातम्या : 

कल्याणमध्ये 350 घरांवर वन विभागाचा हातोडा, दीडशे घरं जमीनदोस्त, भाजप आमदार संतापताच कारवाईला स्थगिती

आजी-आजोबांची आठवण आली आणि ‘ती’ लोकलमध्ये बसली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सात वर्षाच्या चिमुरडीचा शोध

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.