पालघरमध्येही ‘मिशन कवच कुंडल’, रोज अडीचशेपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण

राज्यभरात राबविण्यात येत असलेली मिशन कवच कुंडल ही मोहीम पालघरमध्येही राबविण्यात येत आहे. पालघरमध्ये या मोहिमेअंतर्गत रोज अडीचशेहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात येत आहे. (mission kavach kundal started in palghar district)

पालघरमध्येही 'मिशन कवच कुंडल', रोज अडीचशेपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण
vaccination

पालघर: राज्यभरात राबविण्यात येत असलेली मिशन कवच कुंडल ही मोहीम पालघरमध्येही राबविण्यात येत आहे. पालघरमध्ये या मोहिमेअंतर्गत रोज अडीचशेहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात येत आहे.

मिशन कवच कुंडल ही मोहीम 8 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आठवडाभर दररोज अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 25 लाखापेक्षा अधिक लसीकरण लाभार्थ्यांपैकी 61 टक्के नागरिकांना लसीचे पहिले डोज देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात 23 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे,

तीन ठिकाणी लसीकरण

जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तीन ठिकाणी लसीकरण होणार आहे. तसेच 12 ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. लसीकरणाच्या विशेष मोहिमेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाचे शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग, महसूल विभाग व अन्य संबंधित विभागांना निर्देशित केले आहे.

स्वयंसेवक सक्रिय

मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करणार आहे. याकरिता आरोग्यसेविका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस हे स्वयंसेवक म्हणून कार्य करणार आहेत.

नागपूरमध्ये 75 टक्के नागरिकांचं लसीकरण

दरम्यान, नागपूर शहरातील 75 टक्क्यांच्या वर नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. यापैकी अनेकांनी दुसरा डोज घेतला तर अनेकांचा दुसरा डोज अद्याप बाकी आहे. दुसरा डोज बाकी असलेल्यांनी लवकरात लवकर आपले दोन्ही डोज पूर्ण करून घ्यावे, असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

मुंबईत आज फक्त महिलांचं लसीकरण

कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवणे गरजेचे आहे. याच कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका वेगवगेळ्या मोहिमा राबवत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज (दिनांक 9 ऑक्टोबर) सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत फक्त महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये तसेच कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. ह्यात कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रादेखील घेता येणार आहे. फक्त महिलांसाठी राखीव विशेष सत्र असल्यामुळे उद्यासाठीची ऑनलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या:

कोकणसाठी मोठा दिवस, ठाकरे-राणे-शिंदे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात उद्घाटन होणार, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

ऊसाची FRP एकरकमीच मिळणार, पिषुय गोयल यांचं सदाभाऊ खोतांना आश्वासन

मार्डच्या लढ्याला यश, कोरोनाकाळातील रुग्णसेवेची दखल, प्रत्येक निवासी डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये, आदेश जारी

(mission kavach kundal started in palghar district)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI