मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होताच आमदार राजू पाटील भडकले, केडीएमसीत पुलांवरुन राजकारण शिगेला

केडीएमसी हद्दीतील रखडलेल्या पुलासंदर्भात गुरुवारी (1 एप्रिल) मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकूर्ली पूलावर आंदोलन केले (MNS MLA Raju Patil Angry after case file against MNS party workers).

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 14:31 PM, 3 Apr 2021
मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होताच आमदार राजू पाटील भडकले, केडीएमसीत पुलांवरुन राजकारण शिगेला
मनसे आमदार राजू पाटील

ठाणे : केडीएमसी हद्दीतील रखडलेल्या पुलासंदर्भात गुरुवारी (1 एप्रिल) मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकूर्ली पूलावर आंदोलन केले. त्यांनी 1 एप्रिलचे निमित्त साधून केक कापत प्रशासनाचा निषेध केला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनाविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे (MNS MLA Raju Patil Angry after case file against MNS party workers).

“डोंबिवलीत मनसेने केलेल्या आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल केला. मग आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांच्या उपस्थित वडवली पुलाचे उद्घाटन झाले. तसेच कोपर पूलाच्या लॉचिंगच्या वेळी गर्दी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे कधी दाखल करणार? मनसेला कोणीही गृहीत धरु नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहूले बनू नये. पोलिसांबद्दल नेहमी आदर आहे. त्यांनीही पक्षपातीपणा करु नये, ही आपेक्षा”, असं राजू पाटील ट्विटरवर म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

एप्रिल फुल, डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल, अश्या घोषणा करत आणि केक कापून मनसेने एक एप्रिलला आंदोलन केले होते. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्ते मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे (MNS MLA Raju Patil Angry after case file against MNS party workers).

कल्याण डोंबिवलीतील पुलांचे फार संथ गतीने काम

गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीमधील पुलांचे काम फार संथ गतीने सुरु आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात. मात्र पूल होत नाहीत. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम आद्यपही चालूच आहे. नागरिक आणि प्रवाशी हैराण झाले आहे. मात्र प्रशासन काही वेगाने काम करत नाही. याचा निषेध म्हणून डोंबिवली पश्चिम मधील मनसे कार्यकर्त्यांनी 1 एप्रिलला अनोखे आंदोलन केले. यावेळी “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल”, “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला ठाकुर्लीचा पूल” , “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला पालवाचा पूल”, “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला कोपरचा पूल” अश्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा : VIDEO | कोव्हिड सेंटरच्या परिसरात कर्मचाऱ्यांची दारुची पार्टी, विरोध केल्यानंतर तरुणाला मारहाण